मुलींच्या अंधशाळेला आणि एड्सग्रस्त मुलांना झेंडे, फुगे आणि खाऊ वाटप 

161

पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘पूना स्कुल फॉर ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) येथे अंध मुलींना आणि ‘ममता फाउंडेशन (कात्रज) येथे एड्सग्रस्त मुलांना झेंडे, फुगे, चॉकलेट आणि नाश्ता वाटप करण्यात आले. ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ च्या वतीने हा कार्यक्रम आज सकाळी झाला.

कार्यक्रमाचे यंदाचे 14 वे वर्ष होते. समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा असतो, अशी माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष आणि आयोजक गिरीश गुरनानी यांनी पत्रकाद्वारे दिली. यावेळी अमोल गायकवाड, संदेश कोतकर, गोविंद गुप्ता, विनायक वरपे, उमेश गीरासे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून ट्रस्ट ला वेगळाच आनंद आणि समाधान मिळते. या मुलांना मिळालेले फुगे आणि खाऊ यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ट्रस्ट ला आनंदित करतो, असे देखील गिरीश गुरनानी म्हणाले.