ज्योती गरुड यांना समाजभूषण पुरस्कार

165

चाकण : येथील समाज प्रबोधनकार व सामाजिक कार्यकर्त्या ह. भ. प. ज्योती वामन गरुड यांना पिंपरी – चिंचवड येथील काव्यमित्र संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा राष्ट्रीय आदर्श महिला समाज भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

 समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी ज्योती गरुड यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना हा मानाचा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात काव्यमित्र संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सगर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. सुरेश कांबळे, डॉ. अरुण अडसूळ, शरद थोरात, नंदकुमार वाळूंज, आकाश लोंढे, मेदनकरवाडीचे माजी सरपंच शांताराम मेदनकर, चाकण प्रशालेचे प्राचार्य अरुण देशमुख, प्रवचनकार प्रकाश महाराज पोटवडे, सुदाम महाराज नाणेकर, सामाजिक कार्यकर्ते चारुदत्त वाडेकर आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.