तहसीलदार झिरवाळ  यांच्या अध्यक्षतेखाली मेहकरी येथे रंगणार कवी संमेलन      

187

आष्टी | संतोष तागडे : शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा  व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने कानडी खुर्द (मेहकरी ) येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप पूर्वसंध्येला दिनांक 21 जानेवारी 2019 रोजी रात्री आठ वाजता आष्टीचे तहसीलदार तथा कवी हिरामण झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे.

यामध्ये प्रख्यात कवी प्रा सय्यद अल्लाउद्दीन, डॉ अभय शिंदे,नागेश शेलार, युवराज वायभासे,हरिष हातवटे, अशोक उडाने, इंद्रकुमार झांजे, लक्ष्मण रणशिंग, राजेंद्र लाड, नजमा शेख, संगीता होळकर-आवटे आदी कवी सहभाग घेणार आहेत. या गुलाबी थंडीत हे कवी संमेलन रंगणार असून यामध्ये एकचढ एक कविता सादर करण्यात येणार आहेत.

या बहारदार कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उपस्थिती राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ वायभासे, कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ. पठाण यांनी केले आहे.