भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ वसंत प्रभा  ‘ या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन दि.२७ एप्रिल   २०२४ रोजी   करण्यात आले आहे.नेहा दामले,फाल्गुनी कुलकर्णी,ईशा छत्रे,ईश्वरी करपे यांचे नृत्य सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात येणार  आहे.अर्पिता वैशंपायन(गायन),वेदांग जोशी(तबला),अमेय बिच्चू(हार्मोनियम),तुलसी कुलकर्णी(पढंत),पार्थ भुमकर(पखवाज),उमंग ताडफळे(सतार) हे साथसंगत करणार आहेत. 

हा कार्यक्रम शनिवार, दि.२७ एप्रिल   २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच  वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०४ वा कार्यक्रम  आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.