तरुणीला कुरियरमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून फसविले तर ४० वर्षीय व्यक्तीची परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक; पुण्यात नेमकं चाललंय काय?

पुणे : सायबर चोरट्यांनी शहरातील दोघांची ३२ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. वडगाव शेरी येथील एका तरुणीला कुरियरमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून फसविण्यात आले. तर एका ४० वर्षीय व्यक्तीची शेअर बाजारातील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक करण्यात आली आहे.

पुणेकर हा वडापाव खाल्याशिवाय पुढे जात नाही, असं आहे तरी काय?

पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळून आल्याची भीती दाखवत २२ लाख ९५ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी २९ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर चोरट्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. २८ फेब्रुवारी ते २१ एप्रिल या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

Big News : शिंदे गटातील बड्या नेत्याच्या गाडीवर हल्ला; वाहनावर भिरकावला दगड; कारची काच फुटली

फिर्यादी तरुणीला सायबर चोरट्यांनी फोन करून सांगितले की, तुमच्या नावाने फेडेक्समधून आलेले पार्सल डिलिव्हरीसाठी थांबविण्यात आले आहे. त्यामध्ये पाच अवैध पासपोर्ट, लॅपटॉप, कपडे आणि अमली पदार्थ आहेत. याबाबत तुमच्यावर मुंबईतील गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तुमची आम्हाला चौकशी करावी लागले. त्या बहाण्याने स्काईपद्वारे सायबर ठगाने आरबीआय अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून बँक खाते तपासण्याच्या बतावणीने फिर्यादींच्या खात्यावरील २२ लाख ९५ हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतले. खात्यावरील पैसे कमी झाल्यानंतर तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

ब्रेकिंग : उद्या पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार? काँग्रेसचा बडा नेता काँग्रेस सोडणार

शेअर ट्रेडींगद्वारे दहा लाखांची फसवणूक : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एकाला नऊ लाख ८४ हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी, नगर रस्ता वाघोली येथील ४० वर्षीय व्यक्तीने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बापरे! सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रा पवार, पार्थ यांचे ५५ लाखांचे कर्ज; पहा किती संपत्ती…

त्यानुसार जयवंती डेनियल, स्नॅफ, स्वाती पटेल, लॉरेन्स, अर्जुन के गुप्ता आणि मोबाईलधारकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी इन्स्टाग्रामद्वारे फिर्यादींशी संपर्क साधला. त्यानंतर शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीची एक लिंक पाठवून त्यांना ए-वन, झिरो सेवन स्टॉक फॅमिली क्लब या व्हॉटस्अप ग्रुपमध्ये अ‍ॅड केले. त्यानंतर फिर्यादींना गुंतवणुकीवर नफा झाल्याचे सांगून गुंतवणुकीची रक्कम परत पाहिजे असल्यास वीस टक्के नफा शेअरिंग शुल्क भरावे लागेल, असे म्हटले. फिर्यादी सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकले आणि प्रलोभनाला बळी पडून त्यांनी नऊ लाख ८४ हजार रुपये सायबर चोरट्यांच्या हवाली केले.

ED BIG NEWS : पुण्यात चालले काय; ईडीचे पथक पुण्यात, गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यावर छापे