प्रियांकाच्या रिसेप्शनमध्ये पत्नी दीपिकाची ओढणी सावरताना दिसला रणवीर सिंह

152

मुंबईः प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी बॉलिवूडकरांसाठी गुरुवारी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. ही ग्रॅण्ड पार्टी समुद्रक्रिनारी असलेल्या ताज लँड्स अँड या हॉटेलमध्ये पार पडली. पार्टीत नवविवाहित दाम्पत्य दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह पोहोचले होते. यावेळी रणवीर दीपिकाची ओढणी सावरताना दिसला. त्यानंतर रणवीरने हृदयावर हात ठेऊन पुन्हा एकदा दीपिकाकडे त्याच्या प्रेमाची कबुली दिली.

सर्वप्रथम दीपिकाला मिळाले होते प्रियांकाच्या रिसेप्शनचे आमंत्रण…

दीपिका-रणवीर यांनी लग्नानंतर 1 डिसेंबर रोजी मुंबईत रिसेप्शन ठेवले होते. पण याचदिवशी प्रियांका निकसोबत विवाहबद्ध झाली. स्वतःच्या लग्नामुळे प्रियांका दीपिका-रणवीरच्या रिसेप्शनमध्ये सहभागी होऊ शकली नव्हती. रणवीर-दीपिकाने जेव्हा त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती, तेव्हा सर्वप्रथम प्रियांकाने त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. इतकेच नाही तर प्रियांकाने तिच्या रिसेप्शनचे पहिले आमंत्रण दीपिकालाच दिले होते.

प्रियांका-निकच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले हे सेलेब्स…

निकयांकाच्या रिसेप्शनमध्ये सलमान खानसह दीपिका-रणवीर, कतरिना कैफ, स्वरा भास्कर, परिणीती चोप्रा, राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा, करण जोहर, कियारा आडवाणी, यामी गौतम, डाएना पेंटी, नवाज़ुद्दीन सिद्दीकी, दीया मिर्झा, सोफी चौधरी, कार्तिक आर्यन, हरमन बावेजा, जॅकी भगनानी, डिनो मोरया, तनिषा मुखर्जी, गोविंदा, अनिल कपूर, अनुपम खेर, सतीश कौशिक, बॉबी देओल, पूजा हेगडे, राज बब्बर, अमीषा पटेल, साऊथ अॅक्ट्रेस तमन्ना भाटिया, पत्नी प्रियांकासोबत विवेक ओबरॉय, रवीना टंडन, जायरा वसीम, रणधीर कपूर, कंगना रनोट रेखा, विद्या बालन, संजय दत्तसह अनेक बॉलिवूड स्टार्स पोहोचले होते.

1 आणि 2 डिसेंबर रोजी झाले प्रियांका-निकचे लग्न…

प्रियांका-निक यांनी जोधपूरच्या उम्मेद पॅलेस भवन येथे 1 आणि 2 डिसेंबर रोजी लग्न थाटले. 1 डिसेंबर रोजी दोघांचे ख्रिश्चन आणि 2 डिसेंबर रोजी हिंदू पद्धतीने लग्न झाले. लग्नानंतर 4 डिसेंबर रोजी प्रियांकाने नवी दिल्लीत रिसेप्शन दिले होते. त्याला पीएम मोदींनी हजेरी लावली होती. दुसरे रिसेप्शन 19 डिसेंबर रोजी मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये झाले. हे रिसेप्शन प्रियांकाने बिझनेस क्षेत्राशी संबंधत लोकांसाठी आयोजित केले होते.