जावा मोटरसायकल्सचे पहिले शोरूम पुण्यात सुरू

183

15 डिसेंबर, 2018 ׀ पुणे, भारत – क्लासिक लेजंड्स प्रा. लि. ने अभिमानाने भारतातील आपल्या पहिल्या दोन जावा मोटरसायकल्स डीलरशीप्स पुण्यात सुरू होत असल्याची घोषणा केली आहे. देशभरात लवकरच सुरू होणाऱ्या 100 हून अधिक मोटरसायकल्स डीलरशीपमधील हे पहिलेच आऊटलेट आहेत. ही आऊटलेट आता पूर्णपणे कार्यरत झाल्याने पुण्यातील ग्राहकांना ख्यातनाम जावा आणि जावा फोर्टी टू या मोटरसायकल्स बुक करता येतील आणि त्यांची टेस्ट ड्राइव्हही घेता येईल. या डीलरशीप्स बाणेर आणि चिंचवड येथे सुरू करण्यात आल्या आहेत.

चिंचवड: मेसर्स एनएसजी जावा, तळमजला, 202, गावडे इस्टेट, मुंबई पुणे हायवे, चिंचवड स्टेशन, पुणे – 411109

बाणेर: मेसर्स शक्ती ऑटोमोबाइल्स, सर्व्हे क्र. 288/1, पहिला मजला, शिव प्लाझा (कॅफे कॉफी डे समोर), बाणेर, पुणे – 411045

जावा डीलरशीप म्हणजे स्वत:शी, समविचारी व्यक्तींशी आणि मोटरसायकल्सशी संवाद साधण्याची एक जागा. अस्सलता तसेच आपल्या कथा आणि मोटरसायकल्सच्या माध्यमातून गतकाळ आणि वर्तमानातील दुवा सांधण्याची क्षमता हे या डिझाइनमागील मूळ तत्त्व आहे. येथील सजावट म्हणजे बायकर कॅफेच जी जावा या लेजंडची कथा सांगते.

गडद रंगातील लाकडी जोडणी, सुक्ष्म बारकावे, रॉ टेक्सचर्स आणि कापडाची विंटेज ऑक्सब्लड शिवण अशा वैशिष्ट्यांमधून कलाकुसर आणि साहित्यातील प्रामाणिकपणा जपणाऱ्या सुवर्ण काळाची सफर घडवणारी सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे. त्याचवेळी, क्लासिक डिझाइनमधील आधुनिक दृष्टिकोन आणि त्याला देण्यात आलेली आधुनिक इंजिन तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांची जोड यामुळे ही मोटरसायकल समकालीनतेत भर घातले. आख्यायिका आणि मोनोक्रोम लाइफस्टाइलची झलक दृश्यस्वरुपात मांडली जावी यासाठी ही समकालीन क्लासिक जावा मोटरसायकल सादर करताना डिझाइनिंगला अनेक आयाम देण्यात आले आहेत. मग ते मुक्तपणे होणाऱ्या संवादासाठीचे मोठे, अनेकांना सामावून घेणारे टेबल असो, चोखंदळ वाचकांसाठी बारकाईने तयार केलेले पुस्तकांचे कपाट असो की संगीतप्रेमींसाठी मागे सुरू असलेले क्लासिक रॉक असो, हाडाचा मोटरसायकलिस्ट असो किंवा मोटरसायकलिंगच्या जगात सामावून जाण्याची इच्छा असणारी तरुण व्यक्ती असो हे स्टोअर प्रत्येकालाच आपलेपणाची भावना देते.

रुस्तमजीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. बोमन इराणी यांनी क्लासिक लेजंड्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने आलेल्या जावाप्रेमी आणि ग्राहकांच्या उपस्थितीत या शोरूमचे उद्घाटन केले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री. बोमन इराणी म्हणाले की, “पुण्यात जावा मोटरसायकलची पहिली डीलरशीप क्लासिक लेजंड्सचे उद्घाटन करताना अतिशय अभिमान वाटतो आहे. जावा मोटरसायकल्सचा मोठा चाहता वर्ग आहे. मागच्या महिन्यात जावा पुन्हा एकदा भारतात परतली, तो क्षण ऐतिहासिक होता. देशातील मोटरसायकलप्रेमींना या क्लासिक ऑफर्स देताना आम्ही अतिशय सकारात्मक आहोत.” 

 पुढे श्री. आशिष जोशी म्हणाले की, “या मोटरसायकल्सच्या श्रेणीसोबत पुनरागमन करण्याची हीच योग्य वेळ होती. आता भारतातील आलिशान मोटरसायकल्सच्या बाजारपेठेत केवळ चलती आहे म्हणून नव्हे, तर ग्राहक पसंती आणि प्राधान्यामध्ये देखील कमालीचा बदल झालेला दिसतो. उदयपूर येथे अलीकडेच जावा एक्सपिरिअन्स मीडिया राईड प्रोग्राम संपन्न झाला, आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, मोटरसायकल निर्मितीकरिता आम्ही घेत असलेल्या मेहनतीला प्रोत्साहन देणारे हे कौतुक आहे.”

जावा आणि जावा फोर्टी टू मोटरसायकल्समुळे क्लासिक जावाला रेट्रो-कूल असे नवे रुप मिळाले आहे. या मोटरसायकल्स या ब्रँडच्या नव्या शिलेदार आहेत. या आधुनिक बाइक्समध्ये कार्यक्षमता, क्षमता आणि दर्जा यांचा समतोल साधणारी अस्सल जावाची वैशिष्ट्ये आहेत. संपूर्ण नव्या 293 सीसी, लिक्विड कुल्ड, सिंगल सिलेंडर, डीओएचसी इंजिनला डबल क्रॅडल चॅसिसची जोड मिळाल्याने ही बाइक उत्तमरित्या हाताळली जाते आणि या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट स्थिरता यामध्ये असल्याने नवी जावा खऱ्या अर्थाने आधुनिक क्लासिक बाइक ठरते.

जावा आणि जावा फोर्टी टू यांची किंमत अनुक्रमे 1.65 लाख आणि 1.56 लाख (एक्स-शोरूम, पुणे) इतकी आहे आणि बुकिंग्स आता www.jawamotorcycles.com इथे आणि शोरूममध्ये सुरू आहेत.

भारतासाठी आगामी जावा मॉडेल:

जावा : नव्या जावामध्ये मूळ जावाचे कालातीत आणि ख्यातनाम व्यक्तिमत्त्व नव्या रुपात आले आहे. क्लासी, एलिगंट, सोफिस्टिकेटेड, मॅजेस्टिक अशी गतकाळातील अस्सलता आणि ओळखीच्या खुणा जपणारी क्रांतीकारी वैशिष्ट्ये यात आहेतच. वारसा जपू पाहणाऱ्यांसाठी ही बाइक खास तयार करण्यात आली आहे. जुन्या काळातील व्यक्तिमत्त्व आणि आधुनिक काळातील परफॉर्मन्स यामुळे ही बाइक दिसण्यात आणि कामात एक चोखंदळ, क्लासिक निवड ठरते.

जावा फोर्टी टू : सर्व सीमारेषा आणि प्रयोगांना भेदून जाणारी ही एक क्लासिक बाइक आहे. डिझाइनमधील वैचित्र्यपूर्ण रचना आणि अपारंपरिक वैशिष्ट्ये यामुळे फोर्टी टू ही आजवरची सर्वात टोण्ड, मसल्ड, स्पोर्टी आणि सकारात्मक बाईक ठरते. फोर्टी टू तुमच्या हृदयाबरोबरच मेंदूलाही जिंकून घेईल.

नवे जावा इंजिन : 293 सीसी लिक्विड कूल्ड, सिंगल सिलेंडर डीओएचसी इंजिन

इटालियन इंजिनीअरिंगमधील सर्वोत्कृष्ट प्रतिभेसोबत एकत्र येत तयार करण्यात आलेले 293 सीसी लिक्विड कूल्ड, सिंगल सिलेंडर डीओएचसी इंजिन पूर्णपणे नवे असले तरी यातून मिळणारा अनुभव हा अस्सल आणि क्लासिक जावा अनुभव असेल. यात 27 बीएचपी आणि 28 एनएम टॉर्क मिळतो. तसेच, सुयोग्य मिड रेंज आणि फ्लॅट टॉर्क कर्व्हमुळे बाइकची राइड

सातत्यपूर्ण आणि स्थिर होते. मात्र, या बाइकच्या मूळाशी, संपूर्ण क्लासिक लाइनमध्ये आणि याच्या ट्विन एक्झॉस्टच्या प्रत्येक बीटमध्ये आहे अस्सल जावा ज्यावर तुमचं प्रेम आहे. हे इंजिन BS VI प्रमाणनानुसार तयार करण्यात आले आहे.

जावा मोटरसायकल डीलरशीप नेटवर्क:

जावा आणि जावा फोर्टी टू पुढील तीन महिन्यात 100 हून अधिक शोरूम / डीलरशीपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील.

क्लासिक लेजंड्स प्रा.लि.बद्दल:

क्लासिक लेजंड्स प्रा. लि. ही भारतीय कंपनी बाजारपेठेत ख्यातनाम, भव्य मोटरसायकल ब्रँड उपलब्ध करून देण्याच्या हेतूने स्थापण्यात आली. क्लासिक लेजंड्स भारतात खऱ्या अर्थाने लाइफस्टाइल कंपनी म्हणून ओळख निर्माण करण्याच्या हेतूने काम करते आणि मोटरसायकलिंगच्या परिसंस्थेत उपलब्ध उत्पादने आणि सेवांना नव्या रुपात सादर करून क्लासिक ब्रँड्सचा वारसा जपते.

जावा हा झेक रिपब्लिक म्हणजेच पूर्वीच्या झेकोल्सोव्हाकिया या देशातील मोटरसायकर ब्रँड आहे. आपल्या 90 वर्षांच्या दैदिप्यमान कारकिर्दीत या ब्रँडने 120 हून अधिक देशांमध्ये क्लासिक, उत्तम इंजिनीअरिंगचे प्रमाण असलेल्या आणि दमदार मोटरसायकल निर्यात केल्या आहेत. 1960च्या दशकाच्या सुरुवातीला ही कंपनी भारतात आली. सुंदर डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्स या दोन मुख्य वैशिष्ट्यांमुळे या बाइकने चाहत्यांची मने जिंकलीच. पण त्याचबरोबर जगभरात अनेक सन्मानही पटकावले.

आपल्या खास आणि भव्य ब्रँड प्रोफाइलमधून क्लासिक लेजंड्सने सध्या जावा हा ब्रँड पुन्हा नव्याने आणला आहे. पण, हा फक्त ब्रँड म्हणून नाही तर जगण्याची पद्धत म्हणून नव्याने मांडण्यात येत आहे. मूळ जावाची तत्वे आणि त्यातील डीएनए अचूक पकडण्यासाठी क्लासिक लेजंड्सने जागतिक तज्ज्ञांसासेबत डिझाइन आणि इंजिनीअरिंगमध्ये शक्य तितक्या उत्कृष्ट भागीदारांना सोबत घेतले आहे.

Website Link:https://www.jawamotorcycles.com/

Facebook Link:https://www.facebook.com/jawamotorcycles/

Twitter Link: https://twitter.com/jawamotorcycles

Instagram Link: https://instagram.com/jawamotorcycles