पंडीत नेहरु विद्यालयात गोवर रुबेला लसीकरण मोहिम

207

951 विद्याथ्र्यांना लसीकरण

आष्टी | संतोष तागडे : केंद्र सरकारने २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यासाठी राज्यभरात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे.   येथिल पंडीत जवाहरलाल नेहरु विद्यालयात,दि.08 डिसेंबर रोजी गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबवण्यात आली. विद्यालयातील ई. 5 वी ते 10 वी वर्गातील 1083 विद्याथ्र्यांपैकी 951 विद्याथ्र्यांना लसीकरण करण्यात आले असून 1 ली ते 4 थी पर्यंतच्या विद्याथ्र्यांचे पुढील टप्यात लसिकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेकरीता आष्टी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रातर्गत 6 टिम तयार करण्यात आल्या होत्या एक टिम मध्ये चार कर्मचारी असे एकुण 24 कर्मचा-यंाचा या टिम मध्ये सहभाग असल्याचे डॉ. संतोष कोठुळे यांनी सांगीतले.

यावेळी प्रा.आ.केंद्र टाकळसिंगचे वैद्यकिय अधिकारी वैभव क्षीरसागर, आरोग्य सहाय्यक पुष्पराज घाडगे, शांतीनाथ देशमुख,आरोग्य कर्मचारी सय्यद कादर,सय्यद मुबीन,परसराम सानप, संतोष कोल्हे, तर आरोग्य सेविका बनकर,आत्राम,पवार, औटी,गचांडे, गायके, रिठ्ठे, बनसोडे, गायकवाड, सचिन मोटे यांचा सहभाग होता.  लसीकरणावेळी  विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी वनवे, शिक्षक सिदार्थ शिंदे, रोहित सायकड, एस.एम. मोहोळकर, एस.बी. नालकोल, यांनी सहकार्य केले.