आयसीयूमध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार

182

उत्तर प्रदेश, बरेली : माणुसकीला काळीमा फासणारी घटना बरेलीत घडली आहे. बदायूं रोड परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या अल्पवयनी मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णालयातीलच पाच कर्मचाऱ्यांनी हा अतिशय घृणास्पद प्रकार केल्याचा आरोप होतोय.
पीडित मुलीच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावण्यात आला होता. यानंतरही आरोपींनी तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर तिचे हात-पाय बांधली आणि पाच जणांनी एक-एक करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आपल्यासोबत घडलेली घटना सांगण्यासाठी पीडित मुलगी तीन दिवस कळवत होती. अखेर शुक्रवारी तोंडावरून ऑक्सिजन मास्क हटवल्यानंतर तिने आपल्या आजीला बेतलेला प्रसंग सांगितला आणि ही घटना समोर आली.
विषारी किड्याने चावा घेतल्यामुळे भमोरा परिसरातील १६ वर्षीय मुलीवर उचपार सुरू होते. जवळपासच्या डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार करण्यात आले. पण प्रकृती अधिकच बिघडल्याने त्या मुलीला सोमवारी बदायूं रोडला असलेल्या एका खासगी रुग्णालयात सोमवारी दाखल करण्यात आलं. तिला थेट आयसीयूमध्ये दाखल केलं गेलं. बुधवारपर्यंत व्हेंटिलेटवर ठेवल्यानंतर तिची प्रकृती सुधारली होती. नेमकं त्याच रात्री रुग्णालयाच्या पाच कर्मचाऱ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.
पीडिते मुलीने सांगितली घटना
माझ्या तोंडावर त्यावेळी ऑक्सिजन मास्क लावलेला होता. त्यादरम्यान एक इंजेक्शन देण्यात आल्यानं माझी शुद्ध हरपत होती. यावेळी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली. दोन्ही हाथ आणि पायही बांधले. यानंतर पाच कर्मचाऱ्यांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केला. यामध्ये एक कम्पाउंडर तर चार आरोपी सफाई करणारे आहेत. शुक्रवारपर्यंत तिच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावलेला होता. त्यामुळे तिला आपले वडील आल्यावर त्यांना घडलेली घटना सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ते कळलं नाही, असं पीडित मुलीने सांगितलं.