पाण्या अभावी शेतातील उभा कापुस सुकला

168

आष्टी जि. बीड (संतोष तागडे) : जुन माहिन्याच्या सुरुवातील चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतक-यांनी कपाशीची मोठया प्रमाणावर लागवड केली होती. कमी पाण्यावर आणि कमी मेहनतीत कपाशी साधली तर मोठा फायदा होता. त्यामुळे शेतक-यांनी पैसे नसतांनाही उसनवार पैसे घेवुन कपाशी लागवड केली परंतु पावसाने दडी मारल्याने कपासीचे पिक पाण्याअभावी सुकले आहे.

मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाव भरुन वाहिले होते. यंदाही गतवर्षीप्रमाणे पाऊस पडेल या आशेने शेतक-यांनी पेरण्या केल्या पिके सुरुवातीला जोमात आली परंतु पावसाने दडी मारल्याने शेतातील उभे कपासीचे पिक पुरते वाया गेले आहे.  यामुळे शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. कपाशीला यंदा चांगला भाव आहे परंतु शेतातील उभे कपासीचे पिक जळल्याचे पाहुन शेतकरी खिन्न झाला आहे. एवढा भाव चढला पण कापुस नाही नाही वाढला अशी आवस्था निर्माण झाली आहे. दात आहेत तर चणे नाही, चणे आहेत तर दात नाहीत अशी परिस्थीती तालुक्यातील शेतक-यांची झाली आहे.