के.वाय सी. प्रक्रियेसाठी वृद्ध, निराधार, अपंगांची बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रावर तोबा गर्दी

167

आष्टी जि. बीड (संतोष तागडे) : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य सेवा निव्रुत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांनाबँकेस आधार लिंक प्रक्रिया सक्तीची केल्याने बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात लाभार्थांची तोबा गर्दी होत आहे.

तालुक्यात विशेष सहाय्य योजनेंतर्गत जवळपास १५ ते १६ हजार लाभार्थी आहेत त्यातील कित्येक लाभार्थी अंध, अपंग व व्रुध्द असून, आधार लिंक प्रक्रिया सक्तीची केल्याने आपले अनुदान बंद पडते कि काय ? या भीतीपोटी बँकेच्या ग्राहक केंद्रात ताटकळत थांबत आहेत.

आष्टी तहसील प्रशासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड बँक खात्यास लिंक करून के.वाय.सी.पावती व बँक/पोस्ट खाते पुस्तकाची छायांकित प्रत तहसील कार्यालयालयाच्या संजय गांधी योजना विभागात जमा करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. आष्टी शहरात फक्त एकच ग्राहक सेवा केंद्र सुरु असून या ग्राहक सेवा केंद्राच्या दारात सकाळी ९ वाजल्यापासून वृद्ध,अपंग, निराधार यांची गर्दी होत आहे. तहसील प्रशासनाकडून दर वर्षी फक्त बँक खात्याची व आधार कार्डची छायांकित प्रत मागितली जात होती परंतु या वर्षी मात्र आधार के.वाय.सी.करून त्याची छायांकित प्रत मागवली जात असल्याने वृद्ध, व अपंग लाभार्थ्यांना तासन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. अपंग, व्रुध्द याच्या  हाताचे बोटे उमटण्यास अनेक अडचणी येत असल्याने याचा नाहक त्रास होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ही प्रक्रिया तहसील प्रशासनाने लागू केली असल्याने होणाऱ्या नाहक त्रासास कंटाळून के.वाय सी ची हि आट तहसील प्रशासन बंद करणार का..? अस्य प्रतिक्रिया वृद्ध लाभार्थ्यांतून व्यक्त होत आहेत.