शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार : मंगेश कराड  

186

लोणी काळभोर (प्रतिनिधी) : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती  परिसरातील एमआयटी शिक्षण संकुलातील जगविख्यात घुमटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला नसल्यामुळे पूर्व हवेलीतील ग्रामस्थांनी शनिवारी(दि.१३)रोजी  आंदोलन केले .एमआयटी शिक्षण संकुलाचे आर्ट,डीझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ.मंगेश कराड यांनी परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थांच्या समोर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याचे आश्वासन दिले . या वेळी शिवभक्तांनी ढोल वाजवून ,फटाके फोडून व पेढे वाटुन आनंद व्यक्त केला .याबाबत शिवाजी महाराज कृती समितीच्या सदस्यांनी सांगितले की जगातील सर्वात मोठा डोम डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील एम .आय .टी काँलेजमध्ये उभारला आहे . त्यामध्ये जगातील शास्त्रज्ञ ,संत व योध्दे यांचे पुतळे उभारले आहेत .ही बाब सगळ्यांना खुप अभिमानास्पद आहे .पण ज्या राजांनी रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य घालविले त्या राजाला इथे कुठेच स्थान देण्यात आले नाही म्हणून परिसरातील तरुणांनी एकत्र येऊन शिवाजी महाराज कृती समितीची स्थापना करून गेली दोन आठवडे परिसरातील गावागावात बैठका घेतल्या . सदस्यांना अनेक गावातील तरुणांनी पाठिंबा दिला तसेच सदस्यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण माहिती दिली .त्यांनी आंदोलनाला  संपूर्ण पाठिंबा दिला त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा समावेश करावा,या मागणीकरिता पूर्व हवेलीतील ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते हे शनिवार(दि.१३)रोजी सकाळी १० वाजता कदमवाकवस्ती (ता.हवेली)ग्रामपंचायत हद्दीतील महाराष्ट्र बँकेसमोर जमले. याठिकाणी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सुहास गरुड, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचें वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहा.पोलीस निरीक्षक महेश ढवान, श्रीकांत इंगवले, उपनिरीक्षक चेतन थोरबोले व इतर पोलीसांनी योग्य नियोजन करुन ग्रामस्थ व एमआयटी कॉलेज चे कार्याध्यक्ष मंगेश कराड यांच्यामध्ये चर्चा घडवून आणली व मंगेश कराड यांनी पुतळा उभारण्यात येणार असल्याचे सांगितले . त्यामुळे आंदोलनाला यश आले असल्याचे समितील सदस्यांनी सांगितले .

यावेळी  सर्वांनी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सुहास गरुड व लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील  सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विषेश आभार मानले. लोणी काळभोर येथील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया आठवले गट युवक आघाडीच्या कार्यकर्तांनी आंदोलनाला पाठिंबा दिला .