आंतरराष्ट्रीय भूविज्ञान सप्ताहानिमित्त वैज्ञानिक कट्ट्यावर प्रदीप चेल्लप्पन

186

पुणे : मराठी विज्ञान परिषद आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक गप्पा या कार्यक्रमात यावेळी आंतरराष्ट्रीय भूविज्ञान सप्ताहानिमित्त ओमान ऑइल उद्योगसमूहातील वरिष्ठ इंधनविहिर भूवैज्ञानिक प्रदीप चेल्लप्पनश्रोत्यांशी गप्पा मारणार आहेत. शुक्रवार दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ६.०० वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीतील दृक-श्राव्य सभागृहात या विज्ञान गप्पा रंगणार आहेत. ‘कहाणी खनिज तेलाची’ हा त्यांच्या गप्पांचा विषय असणार आहे.

खनिज तेल भूगर्भात तयार होते तरी कसे, तेलाचे साठे जगात कुठे कुठे आहेत, आणि भूगर्भातील खनिज तेल वर आणण्यासाठी काय काय करावे लागते यासंबधी श्री चेल्लप्पन कुतूहलजनक माहिती देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून अधिकाधिक विज्ञानप्रेमींनी या वैज्ञानिक गप्पांचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे विद्याधर बोरकर यांनी केले.