130 जणांचे रायसोनी कॉलेजमध्ये रक्तदान

146

पुणे : राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने वाघोली येथील जीएच रायसोनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये विद्यार्थी व कर्मचारी वर्गातून एकूण 130 जणांनी रक्तदान केले. पुण्यातील जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबिर आयोजिले होते. रक्तपेढीच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. महाट्रान्स्को येथील अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांनी समाजाप्रती बांधिलकीची भावना जोपासल्याबद्दल आणि रक्तदानाविषयी जनजागृती करणार्‍या पोस्टर्सबद्दल त्यांनी कौतुक केले. विभागप्रमुख डॉ. वंदना दुरेजा आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी अतुल उराडे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शिबिराच्या आयोजनात योगदान दिले.