नारायणगाव पोलीस ठाण्यातर्फे “गणराया पुरस्कार’

162

नारायणगाव (टिम पुणे प्रहार) : नारायणगाव पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येक गावातील शिस्तबध्द विसर्जन आणि सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या दोन गणेश मंडळांना सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या संकल्पनेतून नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने “गणराया पुरस्कार 2018′ देऊन गौरविण्यात येणार आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनअंतर्गत गणेश मंडळांसाठी आगळा-वेगळा उपक्रम राबविला असून, पोलीस ठाणे हद्‌दीतील प्रत्येक गावातील जे गणेश मंडळ शिस्तबध्द विसर्जन आणि सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या गणेश मंडळांना पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांच्या हस्ते “गणराया पुरस्कार 2018′ देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती गोरड यांनी दिली.