इदेमित्सु होंडा रेसिंड इंडियाचे कविन क्विंतल यांनी २०२४ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या पहिल्या फेरीत टॉप १५ मध्ये मिळवले स्थान

चँग इंटरनॅशनल सर्किंट (थायलंड), १७ मार्च २०२४ – या सीझनची सकारात्मक सुरुवात करत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करत इदेमित्सु होंडा रेसिंड इंडियाचे रायडर कविन क्विंतल आणि मोहसिन पी यांनी २०२४ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या पहिल्या फेरीची सांगता करत टीमसाठी मौल्यवान पॉइंट्स मिळवले.

 आज तरुण रायडर कविन क्विंतल यांनी लक्षणीय कामगिरी करत एआरआरसीच्या एशिया प्रॉडक्शन २५० सीसी (एपी२५०सीसी) क्लासच्या दुसऱ्या रेसमध्ये टॉप १५ मध्ये स्थान मिळवले. १० रेसच्या या लॅपमध्ये १९ व्या स्थानावरून सुरुवात करत कविन यांनी पहिल्या लॅपपासूनच आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यांनी पुढेही आपले सर्वोत्तम कौशल्य दर्शवत सातत्य राखले. तोडीस तोड स्पर्धकांशी टक्कर देत आणि ट्रॅकवर झालेल्या काही अपघातांचा लाभ घेत ते पुढे जात राहिले आणि 19:09.553 ची वेळ नोंदवत १३ व्या स्थानावरून चेकर्ड लाइन पार केली. रेसदरम्यानचे सातत्य व स्थैर्याने त्यांना ३ पॉइंट्स मिळाले.

कविन यांचे सहकारी मोहसिन पी. यांनीही आजच्या रेसमध्ये दमदार कामगिरी केली. २१ व्या स्थानावरून रेसची सुरुवात करत मोहसिन यांनी आंतरराष्ट्रीय रायडर्सना टक्कर दिली. ट्रॅकवर त्यांनी सातत्य राखले आणि कोणतीही चूक न करता आजची रेस 19:30.033 वेळेत १६ व्या स्थानावर समाप्त केली. दुर्देवाने ते टीमसाठी पॉइंट्स मिळवू शकले नाही.

विशेष म्हणजे, २०२४ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या उद्घाटनपर फेरीत इदेमित्सु होंडा रेसिंग टीमने दोन्ही रेसेसमध्ये मिळून एकूण ५ पॉइंट्स मिळवले.

पहिल्या फेरीच्या सांगतेविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप ही सर्वात कठीण रेसेसपैकी एक मानली जाते आणि उद्घाटनपर फेरीमध्ये सहभागी झालेल्या आमच्या रायडर्सनी खऱ्या अर्थाने होंडाचा डीएनए दाखवून दिला.  या फेरीदरम्यान आमच्या रायडर्सनी दमदार पाया घातला असून या सीझनमध्ये नवे विक्रम करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. कविन आणि मोहसिन यांनी असामान्य चिकाटी दाखवत आपल्या मर्यादावर मात केली व टीमसाठी महत्त्वाचे पॉइंट्स मिळवले. आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. या फेरीने आमच्या टीमला असामान्य अनुभव दिला, जो आगामी फेऱ्यांमध्ये आमच्या रायडर्सना त्यांचे कौशल्य व डावपेच उंचावण्यासाठी उपयुक्त ठरेल.’

इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया रायडर कविन क्विंतल म्हणाले, ‘कालचा दिवस माझ्यासाठी निराशाजनक होता, कारण माझी कामगिरी खराब झाली. विशेषतः सीझनच्या पहिल्याच रेसमध्ये मी निष्प्रभ ठरलो. आज मी माझे कौशल्य आणि मशिन धोरणात्मक पद्धतीने वापरून टीमसाठी पॉइंट्स मिळवण्यावर लक्ष केंद्रत केलं. ट्रॅकवर विविध आव्हानं येऊनही मी शांत राहून सातत्य राखलं. त्यामुळे मला टॉप १५ मध्ये स्थान आणि टीमसाठी पॉइंट्स मिळवणं शक्य झालं.’

इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया रायडर मोहसिन परांबेन म्हणाले, ‘आजचा दिवस माझ्यासाठी अवघड होता, कारण मी २१ व्या स्थानावरून सुरुवात केली. स्थैर्य राखून कोणतीही चूक न करता पुढे जात राहाण्याचे ध्येय मी ठेवले होते. आंतरराष्ट्रीय रायडर्सना कडवी झुंड देत मी १६ व्या स्थानावर रेस समाप्त केली. कोणत्या बाबतीत सुधारणा करायची हे माझ्या लक्षात आले असून पुढच्या रेसपर्यंत त्यावर काम करण्याचे मी ठरवले आहे.

२०२४ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) विषयी – एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपची २७ वी आवृत्ती आशियातील सर्वात स्पर्धात्मक रोड रेसिंग चॅम्पियनशीप असून १९९६ पासून तिचे आयोजन केले जात आहे. २०२४ सीझनमध्ये एकूण सहा फेऱ्यांचा समावेश असून त्यासाठी अधिकृत चाचणी व सीझन ओपनरचे १५-१७ मार्च २०२४ दरम्यान चँग इंटरनॅशनल सर्किट (थायलंड) येथे आयोजन केले जाते. एप्रिल २०२४ मध्ये झुहाई इंटरनॅशनल सर्क्टिचीन येथे दुसऱ्या टप्प्याचे आयोजन केले जाईल. तिसरी फेरी २०२४ च्या जूनमध्ये मोबिलिटी रिसॉर्ट मोतेगीजपान येथे होईल. चौथी, पाचवी आणि सहावी फेरी जुलैसप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये अनुक्रमे इंडोनेशियामलेशिया आणि थायलंड येथे होईल.