Pune Prahar : ग्रामपंचायत प्रशासकपदी पदवीधरांची नेमणूक करा

86

 शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे पुणे शहरपाध्यक्ष आकाश मस्केपाटील यांची मागणी

पुणे (प्रतिनिधी) : राज्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक पदी पदवीधरांची नेमणूक झाली पाहिजे. राज्यामध्ये ज्या ग्रामपंचायत समितीची मुदत संपली आहे त्याठिकाणी प्रशासक नेमले जाणार आहेत. नियमानुसार प्रशासकपदी विस्तार अधिकार्‍यांची नेमणूक केली जाते. विस्तार अधिकारी हा पदवीधर असतो. त्यामुळे पदवीधरांचा प्रशासकपदावर हक्क आहे, विस्तारा अधिकारी हा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नसतो किंवा सदस्य सुद्धा नसतो. त्या त्या गावातील इच्छुक पदवीधरांना त्यांच्या गुणवतेच्या आधारावर संधी मिळावी अशी मागणी शिवसंग्राचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे पुणे शहरपाध्यक्ष आकाश मस्केपाटील यांनी केली आहे.

राजकीय विचारधारेच्या आधारावर नियुक्ती करू नये.पदवीधर निष्पक्षपणे कोणत्याही भेदभावाशिवाय गावची सेवा करू शकतो, ग्रामस्थांना समान वागणूक देऊ शकतो. नवीन कल्पना राबवू शकतो.

प्रशासकपदी पदवीधरांची नेमणूक करत असताना त्या गावातील पदवीधरांच्या अर्ज मागून घेतले पाहिजेत, आलेल्या अर्जामध्ये पदवीधरांचे सामान्य ज्ञान तपासलं पाहिजे. गावच्या विकासाप्रती त्यांच्या कल्पना जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्या नंतर गुणवत्तेच्या आधारावर ती नेमणूक केली पाहिजे.

पदवीधरांची नेमणूक झाल्यास सुशिक्षित नवीन राजकीय नेतृत्व उदयाला येईल. प्रशासनाला पदवीधरांसोबत काम करणे सोपे जाईल.

आज राज्यात प्रशासक नेमणुकीवरून जे रणकंदन सुरू आहे. हा वाद असाच सुरु राहिला तर ग्रामपंचायती भरडल्या जाऊ शकतात. ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प होऊ शकते. सर्वसामान्य ग्रामस्थानी कामे अडून गैरसोय होऊ शकते. राज्य शासनाने इतर कोणाचेही काहीही म्हणणं असलं तरी फक्त आणि फक्त पदवीधरांची नेमणूक केली पाहिजे. जर ग्रामपंचायत प्रशासकपदी पदवीधरांची निष्पक्षपणे नेमणूक होणार असेल तर पालकमंत्र्यांचे मत विचारात घ्यायला काही हरकत नाही.

पदवीधरांची प्रशासकपदी नेमणूक करण्याबाबत  राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री उध्दवजी ठाकरे तसेच ग्रामविकास मंत्री यांना शिवसंग्राम विद्यार्थी आाघाडी पुणेचे शहरपाध्यक्ष आकाश मस्केपाटील, प्रकाश खैरे, अक्षय रणसिंग, आकाश शिंदे, सौरभ पाटील, मंगेश चौगुले, लल्लु मस्के, ओंकार पुजारी, पंकज पिसे, प्रविण पवार, अक्षय घोडके, नितीन खेडकर, यांनी विनंती केली आहे.