Pune Prahar : मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

230

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याविषयी त्यांनी स्वतः ट्विटरवरून माहिती दिली आहे.

आमदार, खासदार यांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर भारतात पहिल्यांदाच एका मुख्यमंत्र्याला कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

चौहान ट्विटमध्ये म्हणाले..:

प्रिय देशवासियांनो, माझ्यात कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावर चाचणी केली असता या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना तसेच माझ्या इतरही सहकार्यांना मी कोविड-19 ची चाचणी करून घेण्याचे तसेच विलगीकरणात राहण्याचे आवाहन करतो.

मी या अनुषंगाने सर्व गाईडलाईन्सचे पालन करत असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःला क्वारंटाईन करणार आहे. राज्यातील जनतेनेही काळजी घ्यावी.

दरम्यान, मध्यप्रदेशमध्ये आतापर्यंत 7,553 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण असून 791 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 17,866 कोरोनाग्रस्त रुग्ण झाले बरे झाले आहेत.