Pune Prahar : 31 जुलैनंतरही लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांचा खुलासा

339

राज्यात असलेले लॉकडाऊन 31 जुलैनंतर उठणार का कि पुन्हा वाढवले जाणार याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाऊन संदर्भात आपली भूमिका मांडली.

ठाकरे म्हणाले..

आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरात प्रयत्न सुरु असून 1 ऑगस्टपासून सध्या असलेले अनेक निर्बंध शिथिल केले जातील.

याला लॉकडाऊन म्हणण्याऐवजी अनलॉकडाऊन म्हणणे संयुक्तिक राहील. ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना संसर्गावर अधिक कठोर उपायोजना कराव्या लागणार आहेत.

दरम्यान, पुढील प्रक्रियेसाठी राज्य सरकार केंद्राच्या सूचनांची वाट पाहत असून त्यानुसार धोरण आखले जाईल असेही एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.