Pune Prahar : आपणही हे ऍप्स् वापरताय? तर व्हा सावध

181

नवी दिल्ली : डाटा लिक होण्याच्या अनेक घटना सातत्याने वाढत आहेत. त्यानंतर आता आपण सर्वात सुरक्षित माननाऱ्या VPN बाबतही मोठी माहिती समोर आली आहे. हाँगकाँग बेस्ड् 7 VPN प्रोव्हायडर्सच्या युजर्सचा डाटा ऑनलाईन लिक झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जर आपणही VPN वापरत असाल तर तुम्हाला आता सावध होण्याची गरज आहे.

VPN च्या 2 कोटी युजर्सचा डाटा लिक झाला आहे. त्यामुळे VPN ला जितकं सुरक्षित मानतो तेवढं ते सुरक्षित नसल्याचे यावरून दिसत आहे.  VPN सर्व्हिसेसचे जगभरात 7 कोटी युजर्स असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यामध्ये जवळपास 1.2TB डाटाचा समावेश आहे.

– UFO VPN

– FAST VPN

– Free VPN

– Super VPN

– Flash VPN

– Secure VPN

– Rabbit VPN

यांसारख्या VPN प्रोव्हायडर्सचा डाटा लिक झाला आहे. याबाबत काही रिसर्च करण्यात आले होते. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली.

vpnMentor च्या रिसर्च टीमने दिलेल्या माहितीमध्ये सांगितले, की VPN Service देणाऱ्या कंपनीने पर्सनली आईडेंटिफिएबल इन्फॉर्मेशन (PII) डाटा ऍप्स् पासून लिक केला आहे. असे असलेतरीदेखील VPN Service देणाऱ्या कंपनीने डाटा लिक झाला नसल्याचा दावा केला आहे.

4.9 आहे या ऍप्सचे रेटिंग

ज्या VPN चा डाटा लिक झाला आहे असे काही ऍप आहेत ते सर्वाधित लोकप्रिय आहेत. त्यांना गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअरवर चांगला रेटिंग मिळाला आहे.

2 कोटी युजर्सचा डाटा लिक

VPN चे कोट्यवधी युजर्स आहेत. यामध्ये 2 कोटी युजर्सचा डाटा लिक झाल्याची माहिती समोर आली आहेत.