एयरटेलच्या 4G स्मार्टफोन ग्राहकांसाठी सुधारीत मोबाईल नेटवर्क उपलब्ध

127

पुणे : भारतातील आघाडीचे टेलिकम्युनिकेशन सर्विस प्रोवायडर असणार्‍या भारती एयरटेल म्हणजेच एयरटेलने आज त्यांच्या महाराष्ट्र आणि गोव्यातील 4G स्मार्टफोन ग्राहकांसाठी सुधारीत मोबाईल नेटवर्क उपलब्ध करुन दिले असल्याची माहिती दिली. या सुधारीत नेटवर्कमुळे ग्राहक आता सर्वोत्तम आवाज दर्जा आणि डेटाचा अनुभव घेऊ शकणार आहेत. त्यामुळे भारतातील सर्वात वेगवान नेटवर्कमध्ये अधिक चांगला स्मार्टफोन अनुभव घेता येणार आहे.

नेटवर्कच्या आवाजाची गुणवत्ता वाढवण्यासाठी कंपनीने त्यांचे 3G नेटवर्क ऑप्टीमाइज बनवले आहे. या नेटवर्कचा आतापर्यंत खूप अधिक वॉईस ट्रॅफिकसाठी वापर केला जात होता. यासाठी आता कंपनीने आता सर्वोत्तम नेटवर्क सोल्युशन्स आणि सुधारीत नेटवर्क सॉफ्टवेअरचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी आता एयरटेल नेटवर्कवर 4G स्मार्टफोन युजर्स सुधारीत आवाज सुस्पष्टता, कॉल स्थिरता आणि कवरेजचा अनुभव घेऊ शकणार आहेत.

डेटा विभागात एयरटेलने त्यांच्या 4G क्षमतेमध्ये वाढ केली आहे. यासाठी कंपनीने महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सर्कलमध्ये 5 MHz FDD LTE 1800 MHz स्पेक्ट्रमच्या नवीनन लेयरची भर टाकली आहे. यासोबतच कंपनीने महाराष्ट्र आणि गोवा राज्यात त्यांचे 4G कव्हरेजही वाढवले आहे. त्यामुळे ग्राहक अखंडपणे हाय स्पीड डेटाचा आनंद लुटू शकणार आहेत. त्यामुळे इनडोर असो वा आउटडोर ग्राहक सुधारीत 4G उपलब्धतेचा अनुभव घेतील. या सुधारणेनंतर 4G स्मार्टफोन युजर्स नेहमी सर्वोत्तम डेटा स्पीडची हमी बाळगू शकतील. अनेक जागतिक संस्थांनी एयरटेल 4G ला सातत्याने भारतातील सर्वात वेगवान नेटवर्क म्हणून जाहीर केले आहे.

सुधारीत 4G उपलब्धतेसोबतच ग्राहक आता एयरटेल वोल्टीचाही वापर करु शकतील, ज्या माध्यमातून एचडी आवाज गुणवत्ता आणि जलद कॉल सेट अप मिळतो. इतकेच नव्हे तर एयरटेल वोल्टीमुळे ग्राहकांना आता 4G उपलब्ध नसल्यास 3G किंवा 2G कनेक्शनची कनेक्टिविटी मिळू शकेल. 200 हून अधिक 4G स्मार्टफोन्स आता एयरटेल व्होल्टला सपोर्ट करत आहेत.