Pune Prahar : पोलीस उपनिरिक्षक विलास धोत्रे कोव्हिड योध्दा पुरस्काराने सन्मानित

262

पुणे (प्रतिनिधी) : जागतिक संकटामध्ये संपूर्ण जग एकजुटीने लढत असताना अशा कठीण परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचारी एकनिष्ठेने जनतेची सेवा करण्यात मग्न आहेत. मग यात सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक विलास धोत्रे कसे मागे राहतील? यांनी मागील तीन महिन्यात स्वत:च्या पगारातून व घरातील काही रोख रकमेतून जेवढे जमेल तेवढे धान्य खरेदी करून गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्याचे मोलाचे काम केले आहे.

याची दखल राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्टने घेतली असून पोलीस उपनिरिक्षक विलास धोत्रे यांचा रविवारी सत्कार करण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष, जयंत हिरे, समीर शेख, नयन नयन पुनाळे, नितीन पगार, अमीन आगा, संतोष अभंग तसेच ‘पुणे प्रहार’चे संपादक प्रतिक गंगणे, कार्यकारी संपादक राम गंगणे यावेळी हजर होते.