Pune Prahar : राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी

151

जयपूर: राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)