Pune Prahar : पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट, सात हजाराहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात

275

करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पुण्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या अमलबजावणीला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला असून मंगळवारी १४ जुलैच्या मध्यरात्री सुरु झालेला लॉकडाउन २३ जुलैपर्यंत कायम असणार आहे.

लॉकडाउनच्या नियमांच पालन व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

अत्यावश्यक सेवा, कामगार वगळता इतरांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. ठिकाण -स्वारगेट

स्वारगेट येथे पोलीस वाहनांची तपासणी करताना.