Pune Prahar : आयुर्वेदाचार्य पांडूरंग महाराज यांचा सत्कार

324

पुणे (सुचिता राहुल हरपळे-भोसले) : लोणी भापकर येथील पांडूरंग महाराज हे गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती पासुन आयुर्वेदीक औषधे स्वत: बनवतात. ही वन औषधे अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देतात. यामध्ये सांधेदुखी, मणक्याच्या विविध आजारावरती लेप, तेल, अर्क उपलब्ध करून देतात.

तसेच डायबेटिस, कफ, खोकला, अशा आजारावरही आयुर्वेदीक औषध त्यांच्याकडे उपलब्ध आहे. ताण-तणाव थकवा कमी होण्यासाठी महाराजांनी श्री राम गोझर्ण अर्क हे शासन मान्यता प्राप्त औषध तयार केले आहे.

औषध मानवी शरीरासाठी उपयुक्त केले आहे. सर्व गोर गरिब सामान्य जनतेसाठी हि सेवा मिळावी ह्यासाठी महाराजांनी बालयोगी पांडुरंग महाराज या सेवेचा वारसा हक्क जपत आहेत. अशा आर्येुवेदाचार्य महाराजांचा सत्कार सौ. ऍड सुचिता राहुल हरपळे-भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.