Pune Prahar : स्वानंद प्रतिष्ठाण मार्फत अल्पदरात ओपीडी सेवा सुरू

272

पुणे : सुचिता राहुल हरपळे-भोसले

स्वानंद अध्यात्मिक प्रतिष्ठाण मार्फत गोरगरीबांना अल्पदरात म्हणजेच फक्त २० रूपयात ओपीडी सेवा (दि. १२) सुरु करण्यात आली. या ओपीडीचे उद्घाटन डॉ.सुभाष रोमण व मा. डॉ. संतोष खरात यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी डॉ. सुभाष रोमण व डॉ. संतोष खरात यांनी संस्थेला सर्वोत्परी आरोग्य सेवेसाठी आपली बांधिलकी असल्याचे सांगितले. तसेच गुरुवर्य ह. भ. प. मच्छिंद्र महाराज लांडगे यांनी संस्थेचा ड्रिम प्रोजेक्ट गोरगरीबांसाठी अल्पदरात हॉस्पिटल उभारणार असल्याचे सांगितले. हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य माणसाला कधीही पैश्यांचे कोडे नाही पडणार केवळ माफक दरातच औषध उपचार होतील. या हॉस्पिटल मध्ये पॅथोलॉजी लॅब, एक्स रे, एम आर आय, सोनोग्रॉफी, इत्यादी सेवा माफक दरात देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले या संस्थेचे उद्दिष्टे हे अगदी स्पष्ट आहेत फक्त सेवा भाव ठेवून जन सेवा हिच ईश्वर सेवा हे ध्येय समोर ठेवून ही संस्था पुढे कार्यरत राहिल.

संस्थेला मदतीचा हात देऊन गोरगरिबांचे सेवेद्वारे अर्शिवाद घ्यावेत. असे आवाहन गुरुवर्य ह. भ. प. मच्छिंद्र महाराज लांडगे यांनी यावेळी व्यक्त केले.

उद्घाटन समारंभावेळी राष्ट्रीय सामाजिक संघ पुणे जिल्हा अध्यक्ष ह. भ. प. तुकाराम नेवाळे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सुनिल घनवट, पुणे शहर अध्यक्ष राहुल चौधरी, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख ऍड. सौ.सुचिता राहुल भोसले – हरपळे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. तसेच देशात व महाराष्ट्रात कोरोना व्हायरस आजारामुळे सर्वत्र बंद असल्या कारणाने राष्ट्रीय सामाजिक संघ महाराष्ट्रचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष राधाकृष्ण भालेकर साहेब, समन्वयक व संपर्क प्रमुख मा. नितिनजी भोसले साहेब व महाराष्ट्रातील संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देऊन ह. भ. प. मच्छींद्रजी महाराज लांडगे याच्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले.