Pune Prahar : बापट साहेब 3 महिने कुठे होतात : करण कोकणे

2751

पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रसार झाला आहे आणि तो वाढतच आहे.कोरोनाची चैन ब्रेक करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत ही पुणेकर नागरिकांची इच्छा होती.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कोरोना च्या संपूर्ण काळात ग्राऊंडवर येऊन काम करत आहेत.

पुण्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय दादांनी पुणेकर नागरिकांच्या हितासाठीच घेतला आहे. आणि सर्व नागरिक या निर्णयाबद्दल दादांच्या पाठीशी आहेत. अजित दादांच्या निर्णयावर टीका करणाऱ्या खासदार बापट साहेबांनी सांगावे ते 3 महिने कुठे होते? स्वतः लोकांपासून गायब राहायचे आणि पालकमंत्री लोकांसाठी अहोरात्र काम करत आहेत त्यांच्या निर्णयाला विरोध करायचा.

बापट साहेब ही वेळ राजकारण करण्याची नाही जनहिताच्या निर्णयावर एकत्र येऊन काम करण्याची आहे. विरोधाला विरोध करणे सोडा सोडा. आणि सहकार्य करा असे पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे अध्यक्ष करण कोकणे यांनी सांगितले.