Pune Prahar : अ‍ॅपलचा तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार

140

भारत-चीन-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर तैवानची फॉक्सकॉन (Foxconn) कंपनी भारतातील चेन्नईच्या श्रीपेरुंबदूरमधील प्रकल्पात 7500 कोटी रुपये गुंतवणूक करून प्रकल्प आणखी मोठा करणार आहे. यामुळे भारतात 7000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

फॉक्सकॉनविषयी..

फॉक्सकॉन कंपनी अ‍ॅपलचे मोबाईल असेंबल करते. हा निर्णय अ‍ॅपलचाच असण्याची शक्यता आहे. कारण अ‍ॅपलने त्याच्या पुरवठादार कंपन्यांना चीनच्या बाहेर उत्पादन प्रकल्प हलविण्यास सांगितले आहे.

फॉक्सकॉनने श्रीपेरुंबदूर प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची योजना बनविली आहे. सध्या येथे आयफोनचे एक्सआर मॉडेल बनविले जाते. ही गुंतवणूक पुढील 3 वर्षांमध्ये केली जाणार आहे.

फॉक्सकॉनद्वारा अ‍ॅपलचे जे अन्य मॉडेल चीनमध्ये बनविले जातात ते आता भारतातच बनणार आहेत. फॉक्सकॉन कंपनीचा आंध्रप्रदेशमध्येही प्रकल्प आहे. ज्यामध्ये कंपनी शाओमीसाठी स्मार्टफोन बनविते.

गेल्या महिन्यातच दिले होते संकेत…

फॉक्सकॉनचे अध्यक्ष लिऊ योंग वे यांनी गेल्या महिन्यातच भारतात गुंतवणूक वाढविणार असल्याचे जाहीर केले होते. अ‍ॅपल काही मॉडेल बंगळुरूमधील तैवानची आणखी एक कंपनी विस्ट्रॉन कॉर्पमधूनही असेम्बल करते. ही कंपनी आणखी एक प्रकल्प उभारणार आहे.