Pune Prahar : कदमवाकवस्तीत एकाच कुुटंबात…

962

लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडेवस्ती परीसरात एकाच कुटुबांतील ६ सदस्य कोरोना पॉजिटीव्ह असल्याचे आढळुन आले आहे. वरील सहा जणांच्यामुळे कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अॅक्टीव्ह कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १८वर पोचली आहे. 

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडेवस्ती परीसरात एकाच कुटुबांतील ६ सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळुन आल्याच्या वृत्तास लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे, आरोग्य अधिकारी डि. जे. जाधव यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, कोरोना बाधित कुटुंबातील काही सदस्य मागील तीन दिवसात अनेकांच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले असुन, वरील कोरोनाबाधित कुटुंबांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांची माहिती गोळा केली जात असल्याची माहितीही डॉ. जाधव यांनी यावेळी दिली आहे.

कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच बाबासाहेब काळभोर व ग्रामपंचायत प्रशासनाने मागिल दहा दिवसापासुन कठोर उपाय योजना राबविल्या असल्या तरी, नागरीक प्रशासनाला पुरेसी साथ देत नसल्याने, कदमवाकवस्ती मधील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढु लागली आहे. यामुळे नागरीक जागे झाल्याशिवाय कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतुन कोरोना हटणार नाही अशी चिन्हे दिसत आहेत.

याबाबत अधिक माहिती देतांना आरोग्य अधिकारी डी. जे. जाधव म्हणाले, घोरपडेवस्ती परीसरात वरील कुटुबांतील एका सदस्याला सर्दी व खोकल्याचा त्रास जानवु लागल्याने, वरील रुग्नांच्या स्वॅब ची तपासनी लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली होती. यात वरील कुटुबांतील एका सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आल्याने, कुंटुबातील पाचही सदस्यांचे स्वॅब तपासले असता, वरील धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. तर वरील कोरोनाबाधित कुटुबांतील सदस्य घोरपडेवस्ती परीसरात वारंवार फिरत असल्याची माहिती मिळाल्याने, घोरपडेवस्ती परीसरातील कोणकोण नागरीक कोरोनाबाधित रुग्नांच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरीकांची माहिती गोळा केली जात आहे. कोरोनाबाधित कुटुंबांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांची स्वॅब तपासले जाणार आहेत.

सरपंचांचे आवाहन

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल बोलतांना सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाने पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह पुर्व हवेलीत धुडगुस घातला आहे. प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेय मात्र नागरीक बेजबाबदारपणे वागत आहे. मांजरी बुद्रुक, उरुळी कांचन येथील वाढत्या कोरोना रुग्नांच्या वाढत्या संख्येपासुन, धडा घेण्याची गरज आहे. यामुळे नागरीकानो आता तरी शहाणे व्हा. बेजबाबदारपणे वागू नका आणि घरात बसून सरकारला सहकार्य करा अशी म्हणन्याची वेळ आली असल्याचेही गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.