Pune Prahar : ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्याचाही कोरोना रिपोर्ट आला ‘पॉझिटिव्ह’

130

बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जया बच्चन यांची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे.

अमिताभ व अभिषेक कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर ऐश्वर्या व आराध्याचा प्राथमिक कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. पण दुपारी फायनल रिपोर्टमध्ये ऐश्वर्या व आराध्या दोघीही कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. काल रात्री अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना नानावटी सुपर स्पेशिलिटी हॉस्पीटलमध्ये भरती आहेत.

अमिताभ बच्चन त्यांना कोविड 19 ची काहीशी लक्षणं आहेत. ते आयसोलेशन युनिटमध्ये आहेत. सकाळी त्यांना हलका ताप आणि श्वास घेण्यात अडचण येत असल्याची माहिती समोर आली होती.