Pune Prahar : अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण

700

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयात हलवलं आहे. कुटुंबीयासह इतरांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट यायचे आहेत.अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली आहे. तसंच गेल्या दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची टेस्ट करावी असंही त्यांनी सांगितलं आहे.