Pune Prahar : लॉकडाऊनमध्ये कामठे व सोरटे अडकले विवाहबंधनात

732

घरातच पार पडला विवाह सोहळा | ठरलेल्या तारखेलाच केला विवाह

वाढत्या लॉकडाऊनमुळे वधू -वर यांनी घेतला निर्णय

फुरसुंगी : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे त्याचा फटका लग्न सोहळ्यावर पडला असल्याचे समोर आले आहे. फुरसुंगी कामठे आळी परिसरात राहणार्‍या शिवभक्त सुनील कामठे यांचे सहा महिन्यांपूर्वी मांजरी गोपाळपट्टी येथील आश्विनी सोरटेे या तरुणीशी लग्न जमले होते. मात्र वाढत्या लॉकडाऊनमुळे ठरलेल्या तारखेप्रमाणे घरीच विवाह सोहळा करण्यात आला.

देशात टाळेबंदी नियम लागू असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची लग्न ठरली होती त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच टाळेबंदी कधी उठेल हा प्रश्नदेखील आहेच. त्यावर तोडगा म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिन कामठे यांच्या मध्यस्थीने कामठे व सोरटे कुटुंबीयांनी नियमांचे पालन करत घरातच विवाह सोहळा उरकून टाकला.

श्री रामभाऊ शिवराम कामठे यांचा मुलगा सुनील व श्री दत्तात्रय सोरटे यांची कन्या आश्विनी यांचा विवाह सहा महिन्यापूर्वीच ठरला होता. त्यावेळी १५ जून ही लग्नाची तारीखही काढण्यात आली होती. मंगल कार्यालय, केटरिंग, सर्व काही ठरवलेही होते. दरम्यानच्या काळात देशात टाळेबंदी नियम लागू झाल्यामुळे लग्न सोहळा करणे कठीण वाटत असले तरी १५ जून या दिवशी लग्न करण्याचा निर्णय कामठे व सोरटे कुटुंबीयांनी केला होता.

लग्न सोहळ्यात केवळ मुलगा आणि मुलगी उपस्थित असणे महत्त्वाचे असल्यामुळे घरातच हा लग्न सोहळा पार पाडला. विशेष म्हणजे घरातील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थित नियमांचे पालन करून विवाह सोहळा पार पडल्याने एकीकडे लाखो रुपये खर्च करुन पैशांची नासाडी करणार्‍यांना ही चपराक असून नवदापत्यांनी घेतलेला निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

शुभाशिर्वाद गोरक्षक पंडीत (मामा) मोडक यांनी दिले तर स्वागत पै. सुहास (आबा) खुटवड यांनी केले.