Pune Prahar : अरेना ऍनिमेशन’चा वर्धापनदिन ‘ऑनलाईन’ साजरा

50

पुणे : सध्या रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ऍनिमेशन क्षेत्रातील अद्ययावत प्रशिक्षण देणाऱ्या ‘अरेना ऍनिमेशन’ या संस्थेचा तेविसावा वर्धापनदिन ऑनलाईन साजरा करण्यात आला. कारकीर्द घडविण्याची संधी म्हणून ऍनिमेशन क्षेत्राशी पुणेकरांची ओळख करून देण्यामध्ये संस्थेचा मोठा वाटा आहे. संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या किमान १० हजार युवकांनी या क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडविली असल्याचा दावा संस्थापक संचालक डॉ. सुनंदा राठी यांनी केला.

या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांत संस्थेचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आशिष राठी, संचालक रेणू परमार, प्लेसमेंट ऑफिसर पूजा पुरोहित यांच्यासह अनेक आजी, माजी विद्यार्थी सहभागी झाले.

सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्राफिक डिझायनिंग, वेब डिझायनिंग, समाज माध्यमे, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग या क्षेत्रात करिअर घडविण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध असून त्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. केवळ दहावी, बारावी एवढे शिक्षण घेतलेल्या युवकांना संस्थेच्या वतीने सहा महिने ते दीड वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. प्रात्यक्षिकांवर भर असलेल्या या अभ्यासक्रमांच्या पूर्ततेनंतर युवकांना १५ हजार ते १ लाख रुपये मासिक उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतात, अशी माहिती संचालक रेणू परमार यांनी दिली.

सध्याच्या करोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊनमुळे सर्वच समाजघटकांवर आर्थिक संकट असल्याने संस्थेच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कर्जाची सुविधा देण्यात येत असून लाभार्थी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर या कर्जाची परतफेड करू शकतात. त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थींच्या आरोग्याची काळजी घेऊन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन स्टडी मटेरियल’ उपलब्ध करून दिले जात आहे.