Pune Prahar : गायकवाडवाडी भागात अवैध वाळू धुण्याचे काम जोमात प्रशासन मात्र कोमात

254

गावकर्‍यांकडून कार्यवाहीसाठी मागणी

पुणे (ॲड. सुचिता राहुल हरपळे-भोसले) : देशामध्ये कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला असताना, सर्व स्तरावरील प्रशासन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी झुंज देत असताना, हवेली तालुक्यातील गायकवाडवाडी परिसरात अवैध पध्दतीने वाळू धुण्याच्या कामाने धुमाकूळ घातल्याने प्रशासनाने वाळू माफियांना आवरायचे की, कोरोनाच्या संकटाला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

याबाबत कारवाई व्हावी यासाठी गावकर्‍यांची सतत मागणी होत आहे. मोठ्या प्रमाणात गावातील रस्ते वाळू वाहतुकीस ये-जा करणार्‍या गाड्यांनी खराब झाला आहे. प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेवून कारवाई करावी कशी मागणी गावकरी करत आहेत.