Pune Prahar : आयुवैदिक पद्धती बरोबरच प्राणायाम करा : डॉ. नागेंद्र

53

पुणे : वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेऊन उतम रोग प्रतिकार शक्ती राखण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या आयुवैदिक उपचार पद्धती बरोबरच प्राणायाम करणे गरजेचे आहे, असे मत स्वामी योग अनुसंधान संस्थनचे कुलपती डॉ. एच. आर. नागेंद्र यानी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘युवकांसाठी योग’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. हे चर्चासत्र फेसबुक माध्यमातून रामकुमार राठी पतंजली योग अध्यासन, आरोग्यशास्त्र विभाग आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले.

यावेळी आरोग्यशात्र विभागाच्या संचालिका डॉ. आरती नगरकर यांनी स्वागतपर भाषण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. समन्वय डॉ. सुनंदा राठी योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद, योग अभ्यासक डॉ. मन्मथ घरोटे आणि भारत सरकारच्या योग व निसर्गोपचार संस्थेचे संचालक डॉ. राघवेंद्र राव यांनी योग व ध्यान यांच्या मानसिक आणि व्यक्तिमत्व विकासावरील परिणामांचा वैज्ञानिक पद्धतीने उलगडा केला.

आज कोविड 19 मुळे सर्वच समाज मानसिक तणावा खाली आहे.विदयार्थी ही परीक्षा रद्द झाल्याने त्याला अपवाद नाहीत. विद्याथ्र्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी योगाचा या अंगीकार करावा, असे आवाहन कळमकर यांनी केले.

यावेळी क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिपक माने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, योगशास्त्रज्ञ डॉ. सुनंदा राठी ,आरोग्यशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक वैद्य गिरीश टिल्लू आदी मान्यवर उपस्थित होते. रामकुमार राठी पतंजली योग अध्यसन , आरोग्यशास्त्र आणि क्रीडा व शाररिक शिक्षण मंडळ यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.