Pune Prahar : पुरंदर तालुक्याने गाठले अर्धशतक; एकट्या सासवडचे 31 रुग्ण

134

सासवड : पिंगोरी  (ता.पुरंदर) येथील मुंबईहून आलेली महिला पाॅझीटिव्ह निघाली होती; पाठोपाठ तिच्या संपर्कातील एकजण पाॅझीटिव्ह आला. तर सासवडला आज चार व खळदला एक.. असे एकाच दिवसात सहा रुग्ण पुरंदर तालुक्यात आढळले; असे तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी सांगितले. दरम्यान; सासवड शहर सील असतानाही पाॅझीटिव्ह रुग्ण सापडण्यात खंड नसल्याने व रुग्ण संपर्कातील हाय रिस्क लोकही नजीक कालावधीत खुप वाढल्याने.. जणु शहरच भयभीत झाले आहे. त्यामुळे उद्या तातडीने तालुका पातळीवरील प्रशासनाची प्रतिबंधात्मक उपाय वाढविण्याबाबत बैठक होत आहे; असे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी आज सांगितले.

आज पिंगोरीला अजून एक व खळदला एक रुग्ण आढळून आला. दोन्ही गावात पाॅझीटिव्ह सापडल्याने तिथल्या उपाययोनाही प्रशासन पाहत आहे. सासवडला अगोदरच्या रुग्ण संपर्कातील दोन व एसटी बसस्थानक आणि दत्तनगर भागात दोन.. असे चार रुग्ण आज सापडले.

खरे तर एका सासवड शहरातील रुग्ण संख्या आज 31 वर पोचून तालुका 50 वर पोचला. त्यातून शहरात असलेला लाॅकडाऊन शिथील न करता उद्या सोमवापर्यंत वाढविला आहे. त्यामुळे आठवडे बाजार आपोआप रद्द झाला आहे; असे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी स्पष्ट केले. सासवडला रुग्ण व रुग्ण संपर्कातील हाय रिस्कमधील लोक वाढल्याने चिंता वाढली. सर्वच लोकांनी शिस्त पाळावी. संसर्गातून बचावासाठी त्रिसूत्री लोकांनी अंमलात आणावी. बाहेरगावी व विशेषतः पुण्याला जा ये करणारांनी कुटुंबाची व समाजाची विषय समजून घेऊन काळजी घ्यावी.. तरच नियंत्रण राहिल. प्रशासनाची प्रतिबंधात्मक उपाय वाढविण्याबाबत बैठक उद्या सोमवारी होत आहे; असेही मुख्याधिकारी जळक यांनी आज सांगितले.

तालुक्याचा हाॅट स्पाॅट सासवड शहर झाले आहे. एकट्या सासवड शहरातील रुग्ण संख्या 31 वर पोचली व चिंता प्रचंड वाढली आहे. तर तालुक्यातील एकुण पाॅझीटिव्ह  रुग्ण संख्या 50 वर पोचल्याने संसर्गाचा धोका आणखी वाढत असल्याचे स्पष्ट आहे. सासवडच्या एकुण 31 रुग्ण संख्येत 26 रुग्ण या नऊ दिवसातील आहेत. म्हणजेच संसर्गाचा वेग वाढल्याचे स्पष्ट आहे. 50 रुग्णांमधील बहुतेक  बाधीत रुग्ण हे मुंबई – पुणे कनेक्शनमधीलच आहेत. त्यामुळे तिकडून येणारे होम क्वारंटाइन केले तरच थोडी आशा आहे; असे जाणकारांकडून स्पष्ट करण्यात आले.