Pune Prahar : 1 जुलैपासून लॉकडाऊन… मुख्यमंत्र्यांनी केल्या सुचना

450

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला संबोधलं आहे. यावेळी त्यांनी अनलॉक-2 आणि लॉकडाऊन संदर्भातली माहिती दिली आहे. येत्या 1 जुलैपासून लॉकडाऊन उठणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच याव्यतिरिक्त त्यांनी लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांचं देखील कौतुक केलं आहे.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी संवादाच्या सुरुवातीला त्यांनी लॉकडाऊनच्या काळात तसंच चक्रीवादळामुळे आर्थिक नुकसान खूप झालं आहे. कोरोनाशी लढता लढता निसर्ग चक्रीवादळाचा संकट आलं असं ते म्हणाले. रायगडमध्ये चक्रीवादळानं थैमानं घातलं. यामुळे चक्रीवादळामुळेही खूप नुकसान झालं असल्याचं त्यांनी सांगितलं.

वादळाच्या तडाख्यात शासन यंत्रणेनं चांगलं काम केलं असल्याचं सांगत निसर्ग चक्रीवादळाची भीषणता होती. वादळात प्राणहानी कमी ठेवण्यातही यश आल्याचं त्यांनी सांगितलं.