पुण्यातील संताच्या पालखी सोहळ्यासोबत २० लोकांना परवानगी : विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर

223

पुणे : कोरोणाच्या पार्श्वभूमीवर होणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्रची पालखी सोहळ्याची परंपरा लक्षात घेऊन आषाढी एकादशीच्या निमित्ताने जाणार्‍या पुणे जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर आळंदी, संत तुकाराम देहू, संत सोपानकाका सासवड, चांगावटेश्वर देवस्थान सासवड, या संताच्या पालखी सोहळ्यास २० लोकांना बस मधून जाण्यास परवानगी देण्यात आली असून या सोबत उपजिल्हाधिकारी किवा तहसिलदार या दर्जचा अधिकारी Incident Commander म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे, तो सर्वांना प्रस्थान ठिकाणावरून पंढरपूर आणि पंढरपूरवरुन परत प्रस्थान ठिकाणापर्यंत घेऊन जाईल.

सदर पालखी सोहळ्यात ६० वर्षावरील व्यक्तीस प्रवेश दिला जाणार नाही, पालखी सोहळ्यात जाणाऱ्या सर्वांची कोरोणा टेस्ट केली जाणार आहे, तसेच सदर व्यक्तीला कसल्याही प्रकारचा आजार असता कामा नये, पालखी सोहळा ज्या बस मध्ये जाणार आहे त्यात सोशल डिस्टिटिंग चे नियम पाळले जाणार आहे, सदर संताच्या पादुका बसमध्ये प्रवास करत असताना कुठेही दर्शनासाठी थांबवणार नाही याची दक्षता घेतली जाणार असून सदर पालखी सोहळा दिनांक ३० जुन रात्री ११ पर्यंत पंढरपूर मध्ये पोहचला पाहीजे, पालखी सोहळा पंढरपूर कडे मार्गस्थ होताना आणि परत पंढरपूरवरुन मार्गस्थ होताना पोलिस व्हॅन सोबत असणार आहे,वरील सर्व सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर यांनी सांगितले आहे.