Pune Prahar : 1 जुलैपासून ATM चे नियम बदलणार?

147

एप्रिल ते जून या 3 महिन्यांच्या कालावधीत कोरोना महामारीमुळे विविध बँकांकडून एटीएममधून पैसे काढण्यासाठी काही नियम शिथिल करण्यात आले होते.

मात्र ही मुदत जून अखेर संपत असल्याने 1 जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी पूर्वीप्रमाणे अतिरिक्त शुल्क लागू केले जाणार असल्याची चर्चा आहे.

SBI ने दिली होती सवलत :

कोरोनाच्या या 3 महिने सवलतीच्या काळात स्टेट बँकेने मोठ्या शहरांत एटीएममधून 8 वेळा विनाअतिरिक्त शुल्क पैसे काढण्याची सवलत दिली होती. छोट्या शहरांत हीच मर्यादा 10 वेळा इतकी होती.

मोठ्या शहरात 8 पैकी 5 वेळा स्टेट बँकेच्या एटीएममधून तर 3 वेळा इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढता येत होते. हे प्रमाण लहान शहरात 10 पैकी 5-5 वेळा असे होते.

दरम्यान, याविषयी अद्याप अधिकृत सूचना जारी झाली नसली तरी सवलतीचे 3 महिने संपल्यामुळे 1 जुलैपासून ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.