Pune Prahar : पुण्यात तब्बल १ कोटीचा गांजा आणि ७५ लाखांचे चरस जप्त,सीमा शुल्क विभागाची कारवाई

124

पुणे : पुणे सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल एक कोटीचा गांजा आणि ७५ लाखांचे चरस जप्त केले आहे. याप्रकरणी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन वाहनेही जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांकडे एक कोटी किंमतीचे ८६८ किलो गांजा आणि ७५ लाख रुपयांचे ७.५ किलो चरस आढळून आले.