Pune Prahar : राखी सावंतचा दावा; स्वप्नात आला सुशांत सिंग राजपूत अन् म्हणाला…

179

मुंबई : एकीकडे अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. तर दुसरीकडे राखी सावंतने एक दावा करून सर्वांनाच धक्का दिला आहे. सुशांत सिंह राजपूत पुनर्जन्म घेईल आणि त्याचा जन्म माझ्याच पोटातून होईल, असा दावा राखी सावंतने केला आहे. राखी सावंतने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूत रात्री तिच्या स्वप्नात आला आणि त्याने पुन्हा जन्म घेणार असल्याचे सांगितले आहे.

राखी सावंत म्हणाली, “मी रात्री झोपले होते आणि अचानक मला मोठा धक्का बसला. मी विचारले की कोण आहे? मग आवाज आला – मी सुशांत. माझा विश्वास आहे की, सुशांत माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, मी पुन्हा जन्म घेत आहे. माझ्या चाहत्यांना सांग की, मी पुन्हा जन्मलो. मी म्हणाले – कसे? त्यानंतर तो म्हणाला, मी लवकरच सांगेन. पुन्हा मी म्हणाले, मला सांग. तर सुशांत म्हणाला, राखी तू लग्न करशील आणि मी तुझ्या पोटी जन्म घेईन.”

https://www.instagram.com/rakhisawant2511/?utm_source=ig_embed

राखी सावंतचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा रोष शिगेला पोहोचला आणि त्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गेल्या रविवारी (14 जून) आपले जीवन संपवले. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी त्याने गळफास लावून आत्महत्या केली. सुशांत सिंह राजपूतने मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. मात्र, यावर अजूनही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

https://www.instagram.com/rakhisawant2511/?utm_source=ig_embed

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणातील आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की, सुशांत सिंह राजपूत हा बराच काळ मानसिकदृष्ट्या आजारी होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे सुशांत सिंग राजपूतच्या मानसिक तणावाचे कारण काय होते, ज्यामुळे त्याला आत्महत्या करायला भाग पाडले, अशी चर्चा आता बॉलिवूडमध्ये रंगली आहे.