Upcoming Smartphones : मार्चमध्ये Samsung Galaxy F 15 ते Realme 12+5G हे दमदार स्मार्टफोन्स होणार लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Upcoming Smartphones : अवघ्या काही दिवसांवर मार्च महिना येऊन ठेपला आहे. या मार्च महिन्यात अनेक मोठ्या स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन्स लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. मार्केटमध्ये लाँच झालेल्या स्मार्टफोन्सला टक्कर देण्यासाठी Samsung Galaxy F 15, Nothing Phone (2a), Realme 12+5G सारख्या मोबाईल कंपन्या त्यांचे फ्लॅगशिप मोबाईल लाँच करणार आहेत.

आज आपण मार्चमध्ये लाँच होणाऱ्या काही स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात त्यांचे फिचर्स आणि किंमत.

Realme 12+5G

रिअल मी या कंपनीचा हा स्मार्टफोन मार्चमध्ये लाँच होणार आहे. ६ मार्चला हा मोबाईल लाँच होण्याची दाट शक्यता आहे. काही डिटेल्ससहीत हा मोबाईल फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. प्रिमियम डिझाईन आणि पॉवरफूल प्रोसेसरसहीत हा मोबाईल लाँच केला जाईल. विशेष म्हणजे या मोबाईलमधय्ये कंपनीने Sony LYT-600 Ois ही लेन्स दिली आहे. हा मोबाईल २० हजारांपर्यंत तुम्ही खरेदी करू शकता.

Local Train Video : रेल्वेमध्ये तरुणीचा अश्लील डान्स, कारवाईची होतेय मागणी

Samsung Galaxy F 15

सॅमसंग या कंपनीचा हा आगामी फोन Samsung Galaxy F 15 फ्लिपकार्ट या वेबसाईटवर काही महत्वाच्या डिटेल्ससहीत उपलब्ध करण्यात आला आहे. ४ मार्चला हा मोबाईल लाँच करण्यात येईल. सॅमसंगचा हा मोबाईल लाँच झाल्यानंतर तो फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. या तगड्या मोबाईलमध्ये AMOLED डिस्प्ले आणि 6000 mAh ची मोठी बॅटरी असेल. या मोबाईलची किंमत १५ हजारांपर्यंत असू शकते.

Nothing Phone (2a)

ट्रान्सपरंट नथिंग फोन (2a) या मोबाईलची लाँचिंगची तारीख समोर आली आहे. हा मोबाईल ५ मार्चला लाँच केला जाणार आहे. फ्लिपकार्ट या वेबसाईटवर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल. या मोबाईलच्या लाँचसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कंपनी त्यांचे इअरबड्सही लाँच करू शकते. जर तुम्ही हा मोबाईल घेण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्हाला ५ मार्चपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. या मोबाईलची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Pune Crime : पत्नीसोबतचा वाद, तरुणाने पोलिस चौकीसमोर केले स्वतःवर ब्लेडने वार; पुण्यातील घटना

Criminal Laws Notification : तीन नवे फौजदारी कायदे 1 जुलैपासून देशभरात होणार लागू; सरकारनं काढलं नोटिफिकेशन

Gautami Patil : कोणालाच नाही माहिती गौतमी पाटील हिचं खरं नाव, जाणून घ्या काय आहे नाव…

पुणे : रिंगरोडबाबत मोठा निर्णय : आचारसंहिता काळात भूसंपादन करायचे की नाही? विभागीय आयुक्तांनी दिला ‘हा’ आदेश

Suicide : शेवटी तिने टोकाचा निर्णय घेतलाच…पतीवर जीवापाड प्रेम करणार्‍या पत्नीची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

BIG NEWS : पुण्याचा पाणी प्रश्न मिटणार, अशी आहे पुणेकरांसाठी योजना

Journalist : पत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार ५० हजार दंड व ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास

BIG NEWS : पहिल्या नजरेतच तो बिजनेस वुमनच्या नजरेत भरला, त्याच्या कारमध्ये GPS ट्रॅकर लावला आणि मग, एकदिवस…