Pune Prahar : जागरूकतेला चालना देण्‍यासाठी धक धक धरती गाणे सादर

49

पुणे : आरोग्‍य, पर्यावरण व स्‍वच्‍छताविषयक समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी झटणारी संस्‍था भामला फाऊंडेशन ने भारताची आघाडीची डिजिटल मनोरंजन कंपनी हंगामासोबत सहयोगाने आज धकधक धरती गाणे सादर केले. सुप्रसिद्ध गायक शान सोबत सहयोगाने रचण्‍यात आलेले हे गाणे जैवविविधतेचे महत्त्व आणि त्‍यांचे संवर्धन करण्‍याच्‍या गरजेबबात जागरूकता निर्माण करण्‍याप्रती कार्य करणा-या भामला फाऊंडेशनच्‍या प्रयत्‍नांचा एक भाग आहे. हे गाणे जागतिक पर्यावरण दिनासाठी असलेल्‍या युनायटेड नेशन्‍सच्‍या थीमशी संलग्‍न आहे. युनायटेड नेशन्‍स आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाचे या गाण्‍याला पाठबळ लाभले आहे. हे गाणे आता हंगामा म्‍युझिक, हंगामा प्‍ले, हंगामा आर्टिस्‍ट अलाऊड आणि इतर भागीदार नेटवर्क्‍सवर उपलब्‍ध आहे. तसेच म्‍युझिक व्हिडिओ ५ जूनपासून उपलब्‍ध असेल. 

हे गाणे शान यांनी संगीतबद्ध केले असून स्वानंद किरकिरे यांनी लिहिले आहे. या गाण्‍याला लोकप्रिय गायक अदनान सामीबी. प्राकपलक मुच्‍छलपापोनपायल देवऋचा शर्मासलीम मर्चंटशंकर महादेवनशान आणि श्वेता मोहन यांनी आपला आवाज दिला आहे. तर या गाण्‍याच्‍या व्हिडिओमध्‍ये अक्षय कुमार, राजकुमार राव, भूमी पेडणेकरतापसी पन्‍नू, मनिष पॉल, स्‍वानंद किरकिरे आणि श्‍यामक दावर पाहायला मिळतील. श्‍यामक दावर यांनी गाण्‍याचे नृत्‍यदिग्‍दर्शन देखील KELE आहे. हे गाणे जैवविविधतेच्‍या महत्त्वाला सादर करते आणि सर्वांना एकत्रित येऊन एकजुटीने हरित व आरोग्‍यदायी पर्यावरण निर्माण करण्‍याचे आवाहन करते.

मनोरंजन क्षेत्रातील सर्वात प्रख्‍यात कलाकार हे परफॉर्मन्‍स सादर करताना पाहायला मिळेल, जसे अक्षयकुमारकपिल शर्मादिया मिर्झाशानसोफी चौधरीशंकर महादेवनसलिम सुलेमानयोयो हानीसिंगएमी वेबंताप्रसून जोशीशेखर सुमन आणि अनिता डोंगरे. याव्‍यतिरिक्‍त या कार्यक्रमामध्‍ये युनायटेड नेशन्‍स आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाचे प्रतिनिधी व अधिकारी, खासदार श्री. प्रफुल पटेल आणि स्‍टेट बँक ऑफ इंडियाचे अध्‍यक्ष श्री. रजनीश कुमार हे देखील सामील होणार आहेत.

भामला फाऊंडेशन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एका डिजिटल कार्यक्रमाचे देखील आयोजन करणार आहे. शुक्रवार ५ जून २०२० रोजी सांयकाळी ७ वाजल्‍यापासून हा कार्यक्रम हंगामा म्‍युझिक, हंगामा प्‍लेभामला फाऊंडेडन व टिकटॉक इंडियाचे टिकटॉकवरील स्‍वत:चे अकाऊंट, हंगामा म्‍युझिक व हंगामा आर्टिस्‍ट अलाऊंडचे फेसबुक पेजेससह, बॉलीवूड हंगामा व हंगामा आर्टिस्‍ट अलाऊडच्‍या यूट्यूब चॅनेल्‍सवर पाहता येऊ शकतो. याव्‍यतिरिक्‍त युजर्स एमएक्‍स प्‍लेअर, एअरटेल एक्‍स्‍ट्रीम अॅपटाटा स्‍काय बिंज, वनप्‍लस टीव्‍ही सारख्‍या स्‍मार्ट टीव्‍हींवरील, क्‍लाऊडवॉकर आणि टीसीएलवरील हंगामाप्‍लेच्‍या माध्‍यमातून, तसेच एसीटी फायबरनेट, एएनआय नेटवर्क्‍स, अलायन्‍स ब्रॉडबँड, नेटप्‍लस आणि मेघबाला ब्रॉण्‍डबँड अशा आयएवपींच्‍या माध्‍यमातून हा कार्यक्रम पाहण्‍याचा आनंद घेऊ शकतील. तसेच हंगामाचा शाओमीसोबतचा सहयोग युजर्सना मी टीव्‍ही व मी व्हिडिओवरील हंगामा प्‍लेच्‍या माध्‍यमातून कार्यक्रम पाहण्‍याची सुविधा देईल. हा कार्यक्रम झी5 व जिओ टीव्‍हीवर देखील पाहायला मिळेल. या कार्यक्रमामध्‍ये लाइव्‍ह म्‍युझिकल, डान्‍स व कॉमेडी परफॉर्मन्‍सेसचा समावेश आहे.

हंगामा डिजिटल मीडियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज रॉय म्हणाले, “हवामान बदलाचे परिणाम मर्यादित ठेवण्यासाठी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्या जैवविविधतेचे संवर्धन करणे आवश्यक आहे. आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचे आणि जैवविविधतेचे नुकसान ओळखणे आणि ते मान्‍य करणे देखील खूप महत्वाचे आहे. यासह ही परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलणे देखील आवश्यक आहे. देशातील नागरिकांना अत्यंत महत्त्वाच्या विषयावर प्रशिक्षण देणा-या उपक्रमावर भामला फाऊंडेशनबरोबर पुन्हा काम केल्यामुळे आम्हाला आनंद झाला. हंगामा आणि भागीदार नेटवर्कच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर या गीताची उपस्थिती मोठ्या संख्येने लोकांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश पोहोचविण्यात मदत करेल. हे भारतासह जगभरातील लोकांना जैवविविधतेच्या संरक्षणासाठी कार्य करण्यास प्रोत्साहित करेल.

भामला फाऊंडेशनचे अध्‍यक्ष आसिफ भामला म्‍हणाले, “संगीत लोकांना एकत्र करण्यासाठी आणि सामान्य कारणाकरिता त्यांना एकत्र करण्यासाठी प्रदीर्घ काळापासून ज्ञात आहे. प्लास्टिक प्रदूषण आणि वायू प्रदूषणाबाबत लोकांना शिक्षित करण्यासाठी आम्ही संगीतच्‍या शक्‍तीवर विश्‍वास ठेवला आहे. असे खास उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण मनोरंजन क्षेत्राकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्हाला आनंद होत आहे की आम्हाला हंगामाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आम्हाला विश्वास आहे की हंगामाची जागतिक पोहोच देश आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत हा संदेश पोहोचविण्यात मदत करेल.

या सादरीकरणाबाबत बोलताना संगीतकार व गायक शान म्‍हणाला, “या देशाचे नागरिक म्हणून आपण आपल्या सभोवतालचे वातावरण आणि जैवविविधतेचे नुकसान करणार नाही हे सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जैवविविधतेमुळे होणा-या नुकसानीमुळे आधीच निसर्गामध्ये असे बदल घडून आले आहेतजे सुधारू शकत नाहीत आणि त्याच स्थितीत परत येऊ शकत नाहीत. हवामान बदल रोखण्यासाठी आपल्‍याला सर्व आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. एक कलाकार म्हणून मला या सामर्थ्यशाली उपक्रमाचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो. तसेचभामला फाउंडेशन आणि हंगामासोबत संलग्‍न झाल्याने मला खूप आनंद झाला आहेज्यामुळे आम्हाला या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी एकत्र काम करण्याची संधी मिळाली.

गीतकार स्‍वानंद किरकिरे म्‍हणाले, “गेल्या कित्येक वर्षांपासून भामला फाउंडेशन त्वरित लक्ष देण्याची गरज असलेल्‍यापर्यावरणविषयक बाबींवर जनजागृती करण्याच्या दिशेने काम करीत आहे. आपल्या जैवविविधतेचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी आपण एकमेकांच्‍या सहकार्याने कार्य करण्याची आवश्यकता आहे. मला खूप सन्मान वाटतो की मला गाण्याचे बोल लिहिण्याची संधी मिळाली. हे गाणे जगभरातील लोकांना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहित करू शकते. मला विश्‍वास आहे की हे गाणे लोकांना आवडेल आणि निसर्गाच्या अनुषंगाने असे वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल.

हे गाणे आजपासून हंगामा म्‍युझिक, हंगामा प्‍ले आणि हंगामा आर्टिस्‍ट अलाऊडवर उपलब्‍ध आहे. हे गाणे ऐकण्‍यासाठी कृपया https://www.hungama.com/album/dhakk-dhakk-dharti/53957228/ या लिंकला भेट द्या.