Pune Prahar : पेठ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयश्री चौधरी बिनविरोध

193

उरुळी कांचन : पेठ (ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयश्री लक्ष्मण चौधरी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. माजी उपसरपंच उषा विनायक चौधरी यांनी राजीनामा दिल्याने सदरच्या जागेवर निवडणूक घेण्यात आली.

एकमेव अर्ज उपसरपंच पदासाठी जयश्री लक्ष्मण चौधरी यांचा आल्याने उपसरपंचपदी जयश्री लक्ष्मण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. पेठ ग्रामपंचायतच्या सरपंच कमल पोपट शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सदरची निवडणूक पार पडली.

तर ग्रामसेवक  उज्वला हिंगणे यांनी कामकाज पाहिले. यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रघुनाथ चौधरी, ग्रामपंचायत सदस्य – माजी उपसरपंच युवराज चौधरी,  पोलिस पाटील दत्तात्रय चौधरी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सुजित चौधरी, अर्जुन चौधरी, उषा चौधरी, स्वाती गायकवाड, सचिन हाके, भारती आढाव, विनायक चौधरी, ग्रामस्थ उपस्थित होते.