Pune Prahar : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नारायणगाव भगवेमय

100

नारायणगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नारायणगाव शहरात नवचैतन्य जागविणेसाठी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून संपूर्ण गावात भगवे झेंडे उभारून नारायणगाव भगवेमय करण्यात आले.

शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला नारायणगावातील पूर्व व पश्चिम वेस,सार्वजनिक इमारती, ग्रामपंचायत कार्यालय तसेच मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याच्या दुतर्फा सर्वत्र भगवे झेंडे नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने उभारणेत आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य हे संघर्षात गेले आहे अनेक लढाया त्यांनी जिंकल्या, अनेक संकटांचा सामना त्यांनी केला, संकटाला कधीही घाबरले नाही त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाचे संकट जगावर घोंगावत असताना नारायणगाववातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून याही संकटावर मात करावी, नागरिकांमध्ये उत्साहाचे तसेच चैतन्याचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून मोठ्या उत्साहात शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्याबाबत ठरल्याचे सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांनी माहिती दिली. सकाळी पूर्व वेस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व परिसर यांची फुलांनी सजावट करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या पुतळ्यास लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांच्या हस्ते दुधाने अभिषेक घालून,महाराजांची आरती व शिववंदना घेऊन अभिवादन करणेत आले.

यावेळी मा.उपसरपंच आशिष माळवदकर, आरिफ आतार, संतोष दांगट, अनिल खैरे अजित वाजगे, निलेश जाधव, भाग्येश्वर डेरे, किरण ताजने, नंदू अडसरे, मयूर विटे, संदीप पाटे, अजय पाटे, मंदार पाटे, हेमंत कोल्हे, ईश्वर पाटे, जालिंदर खैरे, निलेश दळवी, सचिन जुंदरे, राजेश कर्पे, प्रवीण जगताप ईत्यादी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन ग्रामपंचायत सदस्य राजेश भैय्या बाप्ते यांनी केले.