विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क माफ करा : आकाश मस्केपाटील

175

पुणे (प्रतिनिधी) : राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महाविद्यालयीन परिक्षा रद्द केल्या व पदवी व पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परिक्षासाठी मागील सर्व सेमिस्टरची सरासरी करुन त्या आधारे गुणांकन करण्याचा निर्णय झाला आहे.

परंतु कोणत्याही पदवी व पदव्युत्तर परिक्षा होणार नसतांना मात्र काही विद्यापीठ व महाविद्यालयाने फी आकारणी केलेली आहे जी की नियमांना धरुन नाही. ही फी ज्या त्या विद्यार्थ्यांना परत करावी व अशा प्रकारची परिक्षा फी आकारु नये अशी मागणी शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी पुणेचे शहर उपाध्यक्ष आकाश मस्केपाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या वतीने केली आहे.

सध्या कोरोना सारख्या गंभीर स्थितिमध्ये बर्‍याच कुटुंबांचा आर्थिक प्रश्न बिकट होत असतांना परिक्षा होणार नसल्यामुळे अश्या प्रकारे फी आकारणी करुन गरीब व सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या युवक व विद्यार्थी यांची अडचण वाढवण्याच काम होत आहे. यावर तातडीने लक्ष घालुन मंत्री महोदयांनी हा प्रकार बंद करावा अशी विनंती शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीच्या वतीने आकाश मस्केपाटील यांनी केली आहे.