Pune Prahar : १०० वॅटचा बल्ब लावल्याच्या कारणावरून घरमालकाने केली भाडेकरूची हत्या

75

उत्तर पूर्व दिल्लीतील हर्ष विहार परिसरात एका घर मालकानं क्षुल्लक कारणावरून आपल्या भाडेकरूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. भाडेकरूनं घरात १०० वॅटचा बल्ब लावल्याच्या कारणावरून घरमालकानं आपल्या भाडेकरूला मारहाण केली. मारहाणीत भाडेकरू सोफ्याला असलेल्या लाकडावर आपडला आणि बेशुद्ध झाला.

दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांना त्याला त्वरित रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून घरमालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. जगदीश असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

गेल्या दोन वर्षांपासून जगदीश आणि त्याचे कुटुंबीय त्या घरात राहत होते. गुरूवारी संध्याकाळी त्याची पत्नी १०० वॅटचा बल्ब लावून जेवण तयार करत होती. त्याचवेळी घरमालक मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या घरात पोहोचला. यावेळी त्यानं १०० वॅटच्या बल्बमुळे अधिक वीज खर्च खत होत असल्याचं म्हणत आरडाओरड सुरू केली. त्यानंतर त्यानं तो बल्ब काढून आपल्या घरातून कमी वॅटचा बल्ब आणून दिला.

ओरडण्याचा आवाज ऐकून जगदीश त्या ठिकाणी पोहोचला आणि त्यानं पत्नीला याबाबत विचारणा केली. त्यावेळी घरमालकही त्या ठिकाणी पोहोचला आणि त्यानं जगदीशवर हात उगारला. त्याच क्षणी जगदीश सोफ्याला असलेल्या एका लाकडावर आदळला आणि बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

जगदीश हा ई-रिक्षा चालक होता. तो आपली पत्नी आणि ८ वर्षीय मुलीसह हर्ष विहार परिसरात राहत होता. तो दिल्लीत भाड्याची रिक्षा चालवून आपल्या कुटुंबीयांचं पोट भरत होते.

परंतु आता त्याच्या पत्नीसमोर आपल्या मुलीला कसं वाढवायचं हा प्रश्न पडला आहे.