Pune Prahar : जुन्नर तालुक्यात चित्रनगरी प्रकल्प उभारा : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

268

नारायणगाव : माझ्या मतदारसंघातील माळशेज परिसरात अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण होते. त्यामुळे पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळालेल्या जुन्नर परिसरात चित्रनगरी प्रकल्प राबवा अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत केली.

लॉकडाऊन शिथिल करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नाट्य, चित्रपट व मालिका निर्मात्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत या बैठकीत सुबोध भावे, आदेश बांदेकर, निखिल साने, नितीन वैद्य, अतुल परचुरे, अवधूत गुप्ते, मंगेश कुलकर्णी, रवी जाधव, विजू माने, राहुल देशपांडे, अजय भालवणकर, मुक्ता बर्वे, केदार शिंदे, सुकन्या मोने, पुष्कर श्रोत्री,  हेमंत ढोमे, प्रशांत दामले, सुभाष नकाशे, प्रसाद महाडकर, शरद पोंक्षे आदी उपस्थित मान्यवरांनी सहभाग घेतला होता .आपली भूमिका मांडताना डॉ. कोल्हे म्हणाले की, रोजगाराच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातून मुंबईसह इतर ठिकाणी देखील चित्रिकरण करण्यासाठी चित्रनगरी प्रकल्प राबवता येऊ शकेल.

कोल्हापूर प्रमाणेच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण जुन्नर लगतच्या माळशेज परिसरात होत असते. त्यामुळे पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळालेल्या जुन्नर परिसरात चित्रनगरी उभारण्यात यावी अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी केली.