राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंना ‘या’ कारणासाठी पत्र

176

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ईव्हीएमबद्दल आक्रमक झाले असून, आज त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही पत्र पाठवले आहे. ईव्हीएमवर बंदी आणू अथवा निवडणूकीवर बहिष्कार घालू या, असे आवाहन करत राज यांनी ईव्हीएमबाबत शंका अधिक अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर राज यांनी वारंवार ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. सध्या राज यांनी सर्व पक्षांच्या अध्यक्षांना ईव्हीएमवर बंदी आणण्यासाठी विनंतीपत्र पाठवण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही त्यांनी नुकतेच पत्र पाठवले. आज राज यांचे कट्टर राजकीय स्पर्धक उद्धव ठाकरे यांनाही पत्र पाठवून दोन पावले मागे घेत राजकीय शिष्टाचार पाळल्याचे मानले जात आहे.

उद्धव यांना टाळी मागणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, ईव्हीएमविरोधात राज यांनी उद्धव यांच्याकडे प्रतिसाद देण्याची मागणी करत शिवसेना आणि मनसेमधील अबोला बोलका करण्याचा प्रयत्न केला आहे.