फुफ्फुसदाहाने त्रस्त रुग्णांसाठी ग्लेनमार्कचा एआयआरजेड-एफएफ  इनहेलर बाजारात

50

पुणे | संशोधनाधारित दृष्टिकोन ठेवून औषधनिर्मिती करणा-या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ने आज फुफ्फुसदाहा वर   तीव्र अडथळा आणणारा फुफ्फुसाचा रोग (Chronic Obstructive Pulmonary Disease (COPD) तीन मार्गांनी इलाज करणा-या (थ्री इन वन) एआयआरजेड-एफएफ  या इनहेलरचे बाजारात पदार्पण झाल्याची घोषणा केली. या इनहेलर मध्ये श्वसन सुसह्य करणा-या ग्लायकोपायरोनियम आणि फॉर्मोटेरॉल या दोन ब्रॉंकोडायलेटर्स सह फ्ल्यूटिकासोन या औषधी द्रव्यांचा समावेश आहे. या तिहेरी उपचाराचे अनेक फायदे आहेत. श्वसन सुसह्य होणेखोकल्याची जोरदार उबळ येण्याची  शक्यता कमी करणे आणि प्रत्येक उपचारासाठी स्वतंत्र इनहेलर ची आवश्यकता न उरणे. खोकल्याची उबळ येण्याची शक्यता आणि पर्यायाने रुग्णाला रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता कमी होणे हे सध्याच्या स्थितीत अत्यंत महत्त्वाचे आहे.  

एआयआरजेड-एफएफ  (AIRZ-FF) चा भारतातील रुग्णांना कसा फायदा होतो याचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे आणि बहुसंख्य रुग्णांना या इनहेलरच्या वापराने आराम वाटेल अशा उद्देशाने ते उपलब्ध करण्यात आले आहे. सीओपीडी  हा अनेक व्यक्तीना ग्रासणारा गंभीर आजार आहे आणि रक्तदाब किंवा मधुमेहाप्रमाणेच रुग्णाला यावर आयुष्यभर औषधोपचार घ्यावे लागतात.

आजघडीला भारतात सीओपीडी  चे ५ कोटी ५३ लाखाहून अधिक रुग्ण आहेत. गेल्या अवघ्या एका दशकात ही संख्या २४ टक्के वाढली आहे. योग्य माहितीचा अभाव आणि वेळीच रोगनिदान न होणे हे यामागील कारण असल्याचे आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. या कारणांमुळे सीओपीडी  हा भारतात दुस-या क्रमांकाचा प्राणघातक आजार ठरला आहे.

सीओपीडी  हा अनेक दृष्टीने भारतीय सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी आव्हान ठरला आहे. सध्या अनेक वेगवेगळे इनहेलर वापरावे लागत असल्यामुळे रुग्ण योग्य ती काळजी घेत नाहीत आणि इनहेलर वापरण्याचा कंटाळा करतात आणि त्यामुळे त्यांच्यावरील उपचारात अडथळे येतात . मात्र हा तीन औषधांचे मिश्रण असलेला इनहेलर उपलब्ध झाल्याने रुग्णांना त्याचा वापर करणे सुसह्य होईल अशी आम्हाला आशा वाटते , असे प्रतिपादन ग्लेनपार्क फार्मास्युटिकल्स च्या भारतातील औषध व्यवसायाचे तसेच आफ्रिका आणि मध्यपूर्व विभागाचे अध्यक्ष सुरेश वासुदेवन यांनी केले. ते पुढे म्हणालेभारतातील आणि सर्वच जगातील रुग्णांच्या उपचाराच्या गरजा भागवतील अशी औषधे संशोधन प्रक्रियेतून विकसित करणे ग्लेनमार्क सातत्याने करत आहे

सीओपीडी  च्या जगातील एकूण रुग्णांपैकी ३५ टक्के रुग्णांना हा आजार धुम्रपानामुळे होतो.उर्वरित ६५ टक्के रुग्ण धूम्रपान करणारे नसले तरी मध्यम किंवा कमी उत्पन्न असलेल्या देशातील आहेत. भारतात सीओपीडी  च्या रुग्णांपैकी बहुसंख्य धूम्रपान न करणारेच आहेत. त्यांना हा आजार प्रदूषणकाम करताना नाकातोंडात जाणारे वायू तसेच धूळश्वसन मार्गाला वारंवार संसर्ग होणे तसेच घरात पेटणा-या चुलीच्या धुरामुळे होतो. श्वसनादोषांवर इलाज शोधणा-या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मतेज्या रुग्णांना वारंवार किंवा जोराची ढास लागते / उबळ येते अशा रुग्णांना या तिहेरी उपचाराचा सर्वाधिक लाभ होईल.